Friday, October 8, 2021

मज कळेना

मनातले तुझ्या  
का मज कळेना ।
जाऊ कसे दूर 
पाऊल वळेना ।
साथ जन्माची
आठवण सुटेना ।
ओढ मनातली
माझ्या मिटेना ।
Sanjay R.

Thursday, October 7, 2021

कृपा तुझीच हवी माते

कोणी असो नसो
असते सोबत सावली ।
बाळाच्या मागे पुढे
सदा असतेच माऊली ।

भाव तुझ्या चरणी माते
संकटात तू मज पावली ।
येता प्रसंग किती कसाही
मदतीसही तूच धावली ।

गातो मी जयकार तुझा
भक्त तुझा मी माऊली ।
कृपा हवी तुझीच माते
सदा असू दे  सावली ।
Sanjay R.


झाला अर्थाचा अनर्थ

झाला अर्थाचा अनर्थ
गेला लुटून स्वार्थ 
हातात न उरले काही
झोपी गेला परमार्थ ।
लागली काळजी थोडी
चालेल कसा चरितार्थ ।
वचन याद आले तेव्हा
जे करायचे ते निस्वार्थ ।
संत सारेच गेले सांगून
तोचि जीवनाचा अर्थ ।
असावा दूर कुठे तो
बाळगू नका हो स्वार्थ ।
Sanjay R.

" असेच तू हसत राहा "

असेच तू हसत राहा
दिसेल गालावर खळी ।
हास्यातून तुझ्या मग
उमलेल एक कळी ।

लागले वेड मनाला
आठवण मज छळे ।
बघ नेत्रात माझ्या
आसवांचेच ते तळे ।

आस मजला तुझी
मन माझे जाळी ।
बघ जरा तू मज
नाव तुझेच भाळी ।
Sanjay R.

Wednesday, October 6, 2021

" अंतरीचे सुख "

जीवनात या
दोनच वाटा ।
सुख दुःखाला
आहे कुठे तोटा ।

कोण चूकतो
छोटा वा मोठा ।
भुके पुढे बघा
पैसाही खोटा ।

नशिबाचा खेळ
डोईवर गोटा ।
लोळतो कुणी
उशाखाली नोटा ।

असाल दुःखी
सुखाला भेटा ।
सुखात असता
थोडे कष्ट रेटा ।

वैकुंठाच्या दारात
नाही कोणी मोठा ।
असू दे देवा मज
असाच रे छोटा ।
Sanjay R.