Tuesday, October 5, 2021
" सुख दुःख "
दुःखा मागून येते सुख
लावू नको तू रुखरुख ।
वाट जरी ही वळणाची
चालत राहा नाही चूक ।
कष्ट सारे हे जगण्यासाठी
पोट दिले तर आहे भूक ।
खडतर जरी ही वाट तरी
धोंडे सारेच आहेत मूक ।
नको पाहुस दुःख तयाचे
काय खरे नि काय चूक ।
मधेच कोणी देईल साद
अंधार मागे दिसेल अंधुक ।
पुढे पुढे तू चालत राहा
निर्णय तुझा असेल अचूक ।
Sanjay R.
Monday, October 4, 2021
मी असा प्रामाणिक
किती असावे सांगा
मी असा प्रामाणिक ।
आजवर मिळाली मज
हीच तर शिकवणूक ।
प्रयत्नांची पराकाष्टा
आणि तशीच वागणूक ।
हाती मिळते मात्र मज
का हो अशी फसवणूक ।
जो तो लुबाडतो मला
कशी करू मी जपवणूक ।
निसर्गही नाही सोबत
मग होते मनात धकधुक ।
विश्वास करू मी कुणाचा
देवही नाही करत सोडवणूक ।
नशिबाची दोरीच कच्ची
बळी मी हीच माझी हो चूक ।
Sanjay R.
Sunday, October 3, 2021
" आठवण "
तुझे माझे जुळले नाते
मन मनातच गाणे गाते ।
प्रश्न पडतो पुढ्यात माझ्या
सांग मला हे असे का होते ।
करतो मी विचार जेव्हा
मनच माझे हरवून जाते ।
गुंतून जातो तयात मी मग ।
सांग मला हे असे का होते ।
सदा घेतो मी साद तुझीच
का तुला ते कळून येते ।
तुझ्याविना अस्तित्व काय
सांग मला हे असे का होते ।
हाल माझे हे असे बहाल
का तुझीच आठवण होते ।
नेत्र लागले तुझ्या वाटेवर
सांग मला तू केव्हा येते ।
Sanjay R.
" निर्धार "
नसे काहीच कठीण
असता मनात निर्धार ।
मिळते बळ आपोआप
स्वप्नही होतेच साकार ।
साथ मिळते नकळत
फक्त मानायचे आभार ।
मनातले सारे घडते
घेऊन थोडासा आधार ।
Sanjay R.
Subscribe to:
Posts (Atom)