नसे काहीच कठीण
असता मनात निर्धार ।
मिळते बळ आपोआप
स्वप्नही होतेच साकार ।
साथ मिळते नकळत
फक्त मानायचे आभार ।
मनातले सारे घडते
घेऊन थोडासा आधार ।
Sanjay R.
Sunday, October 3, 2021
" निर्धार "
" डोंगर दुर्गम "
अपेक्षांचा डोंगर दुर्गम
वाटही चढाया नाही तिथे ।
ध्येय मात्र वर चढण्याचे
बघू कशाला कोण कुठे ।
सूर्यकिरणे कुठे लपली
अंधाराचा आभास तिथे ।
ध्येय होते मनात एकच
पोहोचलो शिखरा मी तिथे ।
Sanjay R.
Saturday, October 2, 2021
" बापूंची ती खादी "
यादच नाही राहात
करु कशाची यादी ।
देशासाठी लढले किती
असतो त्याच नादी ।
फाटका घालतो सदरा
परी बापूंची ती खादी ।
पाळतो अहिंसेचे व्रत
सांगून गेली दादी ।
रघुपतीचे गातो भजन
झोपायच्या मी आधी ।
भुमीवर टाकतो अंग
कुठे कशाची गादी ।
याद करतो बापूंना
राहणी माझी साधी ।
भारतमातेचा पुत्र मी
नमन करतो आधी ।
Sanjay R.
" करायचे किती कष्ट "
करायचे किती काम
झेलयचे किती कष्ट ।
निष्फळ होते सारे
फायदा घेतो दुष्ट ।
चोर लबाड तो
झाला किती पुष्ट ।
नशिबाचा फेरा सारा
Friday, October 1, 2021
" तुझी एकच हरकत "
तुझी एकच हरकत
मला सुखावून गेली ।
तहान भूक हरपली
चोरून नजर तू नेली ।
बघतोच कुठे आता मी
असते तूच डोळ्यापुढे ।
मनही असतं धावत
मी मागे नि तू असते पुढे ।
Subscribe to:
Posts (Atom)