Friday, October 1, 2021

" तुझी एकच हरकत "

तुझी एकच हरकत
मला सुखावून गेली ।
तहान भूक हरपली
चोरून नजर तू नेली ।

बघतोच कुठे आता मी
असते तूच डोळ्यापुढे ।
मनही असतं धावत
मी मागे नि तू असते पुढे ।

हळुच गालात तुझं हसणं
नि तिरक्या नेत्राने बघणं ।
हृदय धडधडतं मग माझं
जणू थांबलं माझं जगणं ।

मनही उरलं कुठे माझं
वाटतं तेही तुझं झालं ।
तुझ्याविना नको काहीच
मज सांगना हे कसं झालं ।
Sanjay R.


" हवी कशाला परवानगी "

माझा तर मीच राजा
हवी कशाला परवानगी
बघतो सारे डोळ्यांनी
आहे मनात दिवानगी ।

थबकतात पाऊले कधी
पाहून करामत निसर्गाची ।
फिटते पारणे मग मनाचे
नसते सीमा आनंदाची ।

दुःखाचीही नाही कमी
त्यातच कशास थांबायचे ।
जीवन हे अनमोल किती
बघून पुढेच आहे जगायचे ।
Sanjay R.

Thursday, September 30, 2021

" कहर केला पवासाने "

कशी करू नको चिंता
दिला पावसाने धोका ।

आशा होत्या किती तरी
रंग पडला कसा फिका ।

नशिबाचाच खेळ सारा
पदोपदी का मिळे धोका ।

कहर केला ना पावसाने
पोटावरच दिला ठोका ।

पाण्यात गेली मेहनत
प्रसंग जीवनाचा बाका ।

मुलाबाळांची स्वप्न सारी
काहीच विचारू हो नका ।

निसर्गच कोपला आता
पडला जीवनावर डाका ।

वर्षानु वर्षे तर हेच होते 
आहे हीच जीवनाची रेखा ।
Sanjay R.

" चिंता "

डोकंच झालं खोका
या चिंतेला कुणी रोका 
डोक्याला नाही आराम
होईल हृदयाला धोका ।
विचारच नको कुठले
काढून दूर सारे फेका ।
हलके होईल मस्तक
घाबरू तुम्ही नका ।
मन होईल मग शांत
उठाहो चला काका ।
Sanjay R.

" मार्ग जीवनाचा "

मार्ग जीवनाचा
कठीण किती ।
असते  जेव्हा साथ
नसे कशाची भीती ।
जपायची आपुलकीने
सगळी नाती गोती ।
हृदयाच्या कोनाड्यात
जागा नको रीती ।
हसत खेळत जगायचे
घेऊन हात हाती ।
Sanjay R.