सारून दुःख बाजूला
आनंद थोडा जगायचे ।
बडबड गीत गाऊन मग
खुदकन गालात हसायचे ।
रडायला नाहीत डोळे
त्यातून तिरके बघायचे ।
गाल थोडे फुगवूनच
मस्त पैकी रूसायचे ।
जग बघा सुंदर किती
कशाला दुःख भोगायचे ।
Sanjay R.
दूर किती तो तारा
चमचमतो बिचारा ।
मधेच येऊनि नभ
करी पावसाचा मारा ।
जातो भिजवून चिंब
वाटे मज तो इशारा ।
गन्ध प्रेमाचा तयात
आभास किती न्यारा ।
Sanjay R.
का पण कुणास ठाऊक
वाटतं करावी अनोखी मैत्री ।
यावा कधी मुसळधार पाऊस
असावी तिथे मग एकच छत्री ।
तू आणि मी असू दोघेच
बघावीत स्वप्न तुझीच या नेत्री ।
ओढ लागावी मज तुझी
यावी स्वप्नात माझ्या तूच रात्री ।
घेऊनिया जवळ मग
द्यावी तुजला या मनाची खात्री ।
Sanjay R.
सांग मला शेवटचे
काय माझा अपराध ।
प्रश्न अजूनही आहे
करू नको मज बाद ।
टाक बोलून एकदा
सांग कशाचा हा वाद ।
दूर किती मी एकाकी
घेते अजूनही साद ।
शब्द हवा मज तुझा
ऐकण्या आतुर नाद ।
राहू नकोस तू चूप
कोण रे इथे आजाद ।
ये परतून तू असा
वाटे रिकामा प्रासाद ।
अनमोल हे जीवन
घेऊ जगण्याचा स्वाद ।
Sanjay R.