Wednesday, September 29, 2021

" चुकीला नाही माफी "

चुकीला नाही माफी
बरोबरला कुठे टॉफी ।
स्वतःच व्हायचे खुश
गालावर थोडी लॉफी ।
गुणगुणायची एक ओळ
जसा गायचा तो रफी ।
मनातच स्वतः घ्यायची
मोठी सुवर्णाची ट्रॉफी ।
मनच सांगते मनाला
चुकीला नाही माफी ।
Sanjay R.



" आनंद थोडा जगायचे "

सारून दुःख बाजूला
आनंद थोडा जगायचे ।
बडबड गीत गाऊन मग
खुदकन गालात हसायचे ।
रडायला नाहीत डोळे
त्यातून तिरके बघायचे ।
गाल थोडे फुगवूनच
मस्त पैकी रूसायचे ।
जग बघा सुंदर किती
कशाला दुःख भोगायचे ।
Sanjay R.

Tuesday, September 28, 2021

" दूर किती तो तारा "

दूर किती तो तारा
चमचमतो बिचारा ।
मधेच येऊनि नभ
करी पावसाचा मारा ।
जातो भिजवून चिंब
वाटे मज तो इशारा ।
गन्ध प्रेमाचा तयात
आभास किती न्यारा ।
Sanjay R.


" रंग प्रेमाचा "

का पण कुणास ठाऊक
वाटतं करावी अनोखी मैत्री ।

यावा कधी मुसळधार पाऊस
असावी तिथे मग एकच छत्री ।

तू आणि मी असू दोघेच
बघावीत स्वप्न तुझीच या नेत्री ।

ओढ लागावी मज तुझी
यावी स्वप्नात माझ्या तूच रात्री ।

घेऊनिया जवळ मग
द्यावी तुजला या मनाची खात्री ।
Sanjay R.


Monday, September 27, 2021

" येणार किती तू पावसा "

येणार किती तू पावसा
नको वाटते तुझे येणे ।
थांब ना  आता जरासा
कठीण झाले रे हे जिणे ।

नदी भरली भरले तलाव
 सगळीकडे पाणीच पाणी ।
शेत डुबले पीक सडले
मदतीला रे नाही कोणी ।

डोंगर कर्जाचा माथ्यावर
सावकार वाटतो रे शनी ।
विष प्याया लागेल पैसा
विचार मरणाचा येतो मनी ।

थांबव जरा तुझा तांडव
सूर्य जरासा दिसू दे ना ।
पिकले जरी थोडे तरी
अश्रू पुसून जगू पुन्हा ।
Sanjay R.