" माझे मन "
माझ्या कविता - By Sanjay Ronghe
Wednesday, September 22, 2021
" प्रश्नोत्तर "
कधी प्रश्नाला प्रश्न
नसे उत्तर तयास ।
उत्तरासाठी चाले
किती किती ते प्रयास ।
असो प्रश्न कसाही
मनात उत्तराचा ध्यास ।
प्रश्नच कधी वाटे
करेल का विनाश ।
शोधतो उत्तर जेव्हा
वाटे प्रश्नच आकाश ।
उत्तरात मिळे कधी
जीवनाचा सारांश ।
Sanjay R.
Tuesday, September 21, 2021
" नकळत घडले सारे "
नकळत घडले सारे
अचानक आले वारे ।
कोसळले का आकाश
गेलीत वाहून घरे ।
ना उरला माणूस
ना उरले गुरे ढोरे ।
होत्याचे झाले नव्हते
कोपला का असा रे ।
सांगू कुणास आता
मन मनास विचारे ।
Sanjay R.
Monday, September 20, 2021
" असा कसा रे तू पावसा "
असा कसा रे तू पावसा
नेमका वेळेवर तू आलास ।
भर रस्त्यात मला रे
चिंब भजवून तू गेलास ।
वाट बघतात तुझी जिथे
तिथून तू निघून आलास ।
भिजव थोडी शेती बागा
तिथेच करतो कशाला मिजास ।
गरीब बिचारा तो शेतकरी
अश्रूही नाही त्याच्या डोळ्यास ।
जास्त कधी कमी कधी
नाही उतरत तू भरवश्यास ।
पड जरा जाऊन तिकडे
दाखवू नकोस नुसते आभास ।
तुझ्याविना जीवन व्यर्थ
करतात सारेच तुझा ध्यास ।
Sanjay R.
" नाचे मोर मनात "
नाचे मोर मनात
हर्ष उठे तनात ।
उल्हास होई जागा
आनंद गगनात ।
सोडून दुःख आता
हसायचे क्षणात ।
सुख दुःख येतीजाती
हवे काय जीवनात ।
Sanjay R.
Saturday, September 18, 2021
" काय बोलायचं "
बोलायला नको विषय
हवे नको ते बोलायचे ।
गुपित मनातले सारेच
उघड करून सोडायचे ।
वाणी तारी वाणीच मारी
नाही कुणाला कशाचे ।
शब्दच करी कधी अनर्थ
मात्र मग चूप बसायचे ।
Sanjay R.
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)