कुठे मिळेल ती वाट
मनी भावना अफाट ।
हवेना सारेच मला
इच्छाही भारीच दाट ।
हेही हवे तेही हवे
मनच घालते घाट ।
फेरा नशिबाचा उलटा
मिळताच लागे नाट ।
बसे हिरमुसुन मग
किती हा डोक्याला शॉट ।
Sanjay R.
असेल छोटे गाव
अनोखे त्याचे नाव ।
लोकं तिथले भारी
खातात किती भाव ।
स्वभावाने मात्र शांत
नाही कशाची हाव ।
प्रेमळ किती मायाळू
जीवास जीव लाव ।
गरिबीत जगती सारे
देवा त्यांना तू पाव ।
सुखी कर साऱ्यास
चरणी तुझ्याच धाव ।
Sanjay R.