Wednesday, September 8, 2021

" असते काही अटळ "

कितीही करा प्रयत्न
असते काही अटळ ।
नाही चालत इलाज
संपुष्टात येते बळ ।
निघून जाते सारे
मनात होते हळहळ ।
तर कधो फुले आनंद
अंतरात होई सळसळ ।
अवस्था या मनाच्या
होते किती खट्याळ ।
Sanjay R.


Tuesday, September 7, 2021

" माझे गाव "

असेल छोटे गाव
अनोखे त्याचे नाव ।
लोकं तिथले भारी
खातात किती भाव ।
स्वभावाने मात्र शांत
नाही कशाची हाव ।
प्रेमळ किती मायाळू
जीवास जीव लाव ।
गरिबीत जगती सारे
देवा त्यांना तू पाव ।
सुखी कर साऱ्यास
चरणी तुझ्या धाव ।
Sanjay R.


" चांदणी "

चमचम तू चांदणी
नाही तुजविण कोणी
प्रेयसी तू ग चंद्राची
तो राजा नि तू राणी ।
का छळतो सूर्य तुला
नसे समोर तेव्हा कोणी ।
नभही बघतो दुरून तुज
नि ढळतो होऊन पाणी ।
Sanjay R.

Monday, September 6, 2021

" बैल पोळा "

सण बैलांचा पोळा 
होतात बैल सारे गोळा ।
सजून धजून सारे येती
होतो धन्य पाहुनी डोळा ।
सखा बळीराजाचा तो
सोबती कष्टात भोळा ।
वाहन महादेवाचे तेच
वाजे घुंगरू गळा ।
पूजन आज तयाचे
लागेल तुम्हांसी लळा ।
Sanjay R.

" दूर किती हे हात "

देणार कशी तू साथ
दूर किती हे  हात ।
परिक्रमा ही अनंताची
तिथे काळोखी रात ।

चुकता एक पाऊल
होईल जीवाचा घात ।
वादळ वारा नाही तिथे
फक्त आसवांची बरसात ।

रीत या दुनियेची कशी
कठीण किती देणे मात ।
एकटा इथे मी वाटसरू
मज वाटे मीच अनाथ ।
Sanjay R.