सण बैलांचा पोळा
होतात बैल सारे गोळा ।
सजून धजून सारे येती
होतो धन्य पाहुनी डोळा ।
सखा बळीराजाचा तो
सोबती कष्टात भोळा ।
वाहन महादेवाचे तेच
वाजे घुंगरू गळा ।
पूजन आज तयाचे
लागेल तुम्हांसी लळा ।
Sanjay R.
देणार कशी तू साथ
दूर किती हे हात ।
परिक्रमा ही अनंताची
तिथे काळोखी रात ।
चुकता एक पाऊल
होईल जीवाचा घात ।
वादळ वारा नाही तिथे
फक्त आसवांची बरसात ।
रीत या दुनियेची कशी
कठीण किती देणे मात ।
एकटा इथे मी वाटसरू
मज वाटे मीच अनाथ ।
Sanjay R.
नको तू सोडू काही
मनच मनाला पाही ।
वेदना कोण बघतो
अंतरात फुटते लाही ।
नशिबाचा खेळ सारा
जीव होतो त्राही त्राही ।
शब्दविन कळे कोणा
बोल तू जरा काही ।
मनातले सांगतो माझ्या
शोध मला तू दिशा दाही ।
Sanjay R.
भूत संशयाचे मनी
जसा मागे लागे शनी ।
बंध नात्याचे तुटती
झरते डोळ्यात पानी ।
नको विचार कसले
हवी मधाळ वाणी ।
हवे सुखाचे तरंग
गाऊ आनंदाची गाणी ।
हसत सदा असावे
ही जीवनाची कहाणी ।
Sanjay R.
अंतरात कुठला भाव
करी मनावर घाव ।
कुणा म्हणू मी आपला
आहेत सारेच साव ।
नाही जाण कशाची
नाही कुणास ठाव ।
ओळख कुठे कुणाची
नाही कुणास नाव ।
सर्व सोडिले तुझ्यावर
देवा तूच मजला पाव ।
Sanjay R.