Monday, September 6, 2021

" दूर किती हे हात "

देणार कशी तू साथ
दूर किती हे  हात ।
परिक्रमा ही अनंताची
तिथे काळोखी रात ।

चुकता एक पाऊल
होईल जीवाचा घात ।
वादळ वारा नाही तिथे
फक्त आसवांची बरसात ।

रीत या दुनियेची कशी
कठीण किती देणे मात ।
एकटा इथे मी वाटसरू
मज वाटे मीच अनाथ ।
Sanjay R.



" नको तू सोडू काही "

नको तू सोडू काही
मनच मनाला पाही ।
वेदना कोण बघतो
अंतरात फुटते लाही ।
नशिबाचा खेळ सारा
जीव होतो त्राही त्राही ।
शब्दविन कळे कोणा
बोल तू जरा काही ।
मनातले सांगतो माझ्या
शोध मला तू दिशा दाही ।
Sanjay R.

Sunday, September 5, 2021

" भूत संशयाचे मनी "

भूत संशयाचे मनी
जसा मागे लागे शनी ।
बंध नात्याचे तुटती
झरते डोळ्यात पानी ।
नको विचार कसले
हवी मधाळ वाणी ।
हवे सुखाचे तरंग 
गाऊ आनंदाची गाणी ।
हसत सदा असावे
ही जीवनाची कहाणी ।
Sanjay R.

Saturday, September 4, 2021

" अंतरात कुठला भाव "

अंतरात कुठला भाव
करी मनावर घाव ।
कुणा म्हणू मी आपला
आहेत सारेच साव ।
नाही जाण कशाची
नाही कुणास ठाव ।
ओळख कुठे कुणाची
नाही कुणास नाव ।
सर्व सोडिले तुझ्यावर
देवा तूच मजला पाव ।
Sanjay R.


Friday, September 3, 2021

" विसरू कसे मी सांग "

विसरू कसे मी सांग
कसे फेडील मी पांग ।
उपकार तुझे मजवर
मोजू किती मी सांग ।
पडेल जन्म हा अपुरा
नाही ही भरणार रांग ।
सोडू कसे मी तुजला
प्रेम तुझेची अथांग ।
आईविना लेक पोरका
विसरेल कसा मी सांग ।
Sanjay R.