Wednesday, August 25, 2021

" वेदना "

वेदना म्हणू की संवेदना
जळते  निरंतर अंतरात ।
विचारांची होते घुसमट
ठेऊ किती मी या मनात ।

ठिणगी छोटीसी पुरेशी
धगधगते कशी क्षणात ।
मोह माया प्रेम जरी उरात
राग द्वेष पोचतो गगनात ।

आधार सांगा कुणाचा
जगतो एकटा या जगात ।
जातो सोडून सारे जेव्हा
काय उरते राखेच्या कणात ।
Sanjay R.

Tuesday, August 24, 2021

" कमाई ची ओढ तुझी "

कमाई ची ओढ तुझी
काय किती कमावलं ।
नाती गोती प्रेम विसरला
सारच रे तू गमावलं ।

सारच कसं सुटलं मागे
बघ जरा किती हरवलं ।
पैसा पैसा होता करत
पैशानेच तुला रडवलं ।

आठव जरा रे थोडे तू
जेवण तुला कुणी भरवलं
विसरलास का आई बाबा
त्यांनीच तुला रे घडवलं ।

नको देउस अंतर आता
कोणी कुणास अडवलं ।
सोन्या सोन्या करत तुज
दगडी रत्न कसे जडवल ।
Sanjay R.


Monday, August 23, 2021

" इशारे "

करू नकोस इशारे
कळले मजला सारे ।
अंतरात पेटली आग
धगधगताहेत निखारे ।
आहे कोण इथे कुणाचा
व्यर्थ आहेत नाते सारे ।
नको आता वाटे मजला
दूरच बरे चमचमते तारे ।
Sanjay R.


" दूर किती किनारा "

दूर किती किनारा
झुंज देतोय वारा ।
बेफाम सुटल्या लाटा
वरून पडती धारा ।
डगमगते नाव पाण्यात
करते कुणा इशारा ।
दाटले आकाश ढगांनी
लोपला कुठे तो तारा ।
चमचम करते मधेच
दिसे विजेचा नजारा ।
का कोपला असा तू
हो शांत जरा सागरा ।
Sanjay R.

Saturday, August 21, 2021

" शोधतो मी सूर "

शोधतो एक मी सूर 
मिळता मिळेना ताल ।
हरवलेत शब्द सारे
रुसलेत मग गाल ।
ओठाआड लपले बोल
डोळ्यात अश्रूंची ढाल ।
सुचेना काहीच मग
झालेत मनाचे हाल ।
Sanjay R.