दूर किती किनारा
झुंज देतोय वारा ।
बेफाम सुटल्या लाटा
वरून पडती धारा ।
डगमगते नाव पाण्यात
करते कुणा इशारा ।
दाटले आकाश ढगांनी
लोपला कुठे तो तारा ।
चमचम करते मधेच
दिसे विजेचा नजारा ।
का कोपला असा तू
हो शांत जरा सागरा ।
Sanjay R.
शोधतो एक मी सूर
मिळता मिळेना ताल ।
हरवलेत शब्द सारे
रुसलेत मग गाल ।
ओठाआड लपले बोल
डोळ्यात अश्रूंची ढाल ।
सुचेना काहीच मग
झालेत मनाचे हाल ।
Sanjay R.
अल्याड काय पल्याड काय
समजेना मला ।
बघू कुठे मी शोधू कुठे
सांगू काय तुला ।
ध्यानात काय मनात काय
सांगतो मी तुला ।
शोधते नजर नसतेस हजर
हवी ग तूच मला ।
Sanjay R.
नको जाऊस दूर
नकोच हा दुरावा ।
मनात काय माझ्या
कशास हवा पुरावा ।
ठाऊक तुलाही आहे
चाले कुणाचा धावा ।
आठवण होताच तुझी
मिळतो मज विसावा ।
साथ सदा हवी मज
मनात वाजतो पावा ।
नाते तुझे आणि माझे
आईचा लाडका तू छावा ।
Sanjay R.
सांगू काय कुणाचे
कळत नव्हते मनाचे ।
वेळोवेळी बदले विचार
अर्थच लागेना कशाचे ।
होऊनी वाद किती मग
आलेत दिवस दुःखाचे ।
नको वाटे मग सारेच
तुटलेत धागे मनाचे ।
जुळलेत जेव्हा विचार
आलेत क्षण सुखाचे ।
काय वर्णू मी तयास
फुलले हास्य आनंदाचे ।
Sanjay R.