Tuesday, August 17, 2021

" भार "

नाही खांद्यावर
कुणाच्या भार
आयुष्याच आहे
एक आधार ।

वादळातही तरेल
जीवन नौका
दिवस सुखदुःखाचे
होतील पार ।

दिवसा मागून
जातील दिवस
करतोस कशाला
तू असे विचार ।

हाती तुझ्या रे
सामर्थ्य किती
नको होऊस तू
असा लाचार ।

दिवस हेही
जातील निघून
म्हातारपण हे
नाही बेकार ।

करू नको तू
अति विचार
आहे जगण्याचा
तो एक प्रकार ।
Sanjay R.


Monday, August 16, 2021

" माझा भारत "

माझा देश माझा भारत
तिरंगा अमुचा करतो स्वागत ।
सीमेवरती वीर आमुचे
देती पहारा सदा जागत ।
विसरू कसे बलिदान त्यांचे
रक्त सांडले सर्वस्व त्यागत ।
उंच धरू या झेंडा आपुला
मुठीत आमुच्या आहे ताकद ।
Sanjay R.


" मनात फक्त ध्येय होते "

हातात नव्हते काहीच
मनात फक्त ध्येय होते ।
करून प्रयत्नांची पराकाष्ठा
कळले हातात काय येते ।
अंतरात असेल जर निष्ठा
सारेच कसे सुरळीत होते ।
हटते दुःखाचे वादळ सारे
सुख कसे मग लोटांगण घेते ।
Sanjay R.



Saturday, August 14, 2021

" काय सांगू तुला "

काय सांगू देवा तुला
तूच सांग कसं जगायचं
महागाइने केला कहर
घर कसं चालवायचं ।

प्रत्येक वस्तूचे बघा जरा
दाम झालेत डबल ।
येणार कुठून पैसे खिशात
जीवनच वाटे ट्रबल ।

गरिबांचे हाल किती वाईट
पोट भरणेही कठीण ।
नाही उरला कुणीच वाली
बिघडले सारे रुटीन ।
Sanjay R.

Friday, August 13, 2021

" कुठे काय जमतं "

कुठे काय जमतं
मीच घेतो ना नमतं ।
वाद विवाद चाले सदा
त्यातच मन रमतं ।
नकोच वाटते शांती
कुणास त्यात गमतं ।
हवेत शब्दांचे बाण
मनही तेच म्हणतं ।
सवय झाली मनाला
हास्य वेदनेतही फुलतं ।
साथ तुझीच हवी
त्यातच जीवन फुलतं ।
Sanjay R.