" माझे मन "
माझ्या कविता - By Sanjay Ronghe
Monday, August 16, 2021
" मनात फक्त ध्येय होते "
हातात नव्हते काहीच
मनात फक्त ध्येय होते ।
करून प्रयत्नांची पराकाष्ठा
कळले हातात काय येते ।
अंतरात असेल जर निष्ठा
सारेच कसे सुरळीत होते ।
हटते दुःखाचे वादळ सारे
सुख कसे मग लोटांगण घेते ।
Sanjay R.
Saturday, August 14, 2021
" काय सांगू तुला "
काय सांगू देवा तुला
तूच सांग कसं जगायचं
महागाइने केला कहर
घर कसं चालवायचं ।
प्रत्येक वस्तूचे बघा जरा
दाम झालेत डबल ।
येणार कुठून पैसे खिशात
जीवनच वाटे ट्रबल ।
गरिबांचे हाल किती वाईट
पोट भरणेही कठीण ।
नाही उरला कुणीच वाली
बिघडले सारे रुटीन ।
Sanjay R.
Friday, August 13, 2021
" कुठे काय जमतं "
कुठे काय जमतं
मीच घेतो ना नमतं ।
वाद विवाद चाले सदा
त्यातच मन रमतं ।
नकोच वाटते शांती
कुणास त्यात गमतं ।
हवेत शब्दांचे बाण
मनही तेच म्हणतं ।
सवय झाली मनाला
हास्य वेदनेतही फुलतं ।
साथ तुझीच हवी
त्यातच जीवन फुलतं ।
Sanjay R.
Thursday, August 12, 2021
" टळत नाही वेळ कधी "
घड्याळ चाले पुढे
वेळेची महती महान ।
घडते वेळेवर सारे
देई आनंद छान ।
नका बघू मागे जरा
द्या उद्याकडे ध्यान ।
घडेल कार्य मोठे
व्हाल तुम्हीही महान ।
टळत नाही वेळ कधी
मोठा कोण लहान ।
Sanjay R.
Wednesday, August 11, 2021
" भावनांचे तरंग "
अंतरात माझ्या कुठे
भावनांचे तरंग उठे ।
कळेना काहीच मज
काय खरे काय खोटे ।
आठवणींच्या डोहात
मन असे हे का छोटे ।
विचारांशी विचार जुळे
बळ आनंदाचे मोठे ।
Sanjay R.
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)