Thursday, August 12, 2021

" टळत नाही वेळ कधी "

घड्याळ चाले पुढे
वेळेची महती महान ।
घडते वेळेवर सारे
देई आनंद छान ।
नका बघू मागे जरा
द्या उद्याकडे ध्यान ।
घडेल कार्य मोठे
व्हाल तुम्हीही महान ।
टळत नाही वेळ कधी
मोठा कोण लहान ।
Sanjay R.

Wednesday, August 11, 2021

" भावनांचे तरंग "

अंतरात माझ्या कुठे
भावनांचे तरंग उठे ।
कळेना काहीच मज
काय खरे काय खोटे ।
आठवणींच्या डोहात
मन असे हे का छोटे ।
विचारांशी विचार जुळे
बळ आनंदाचे मोठे ।
Sanjay R.

" किरण आशेचा "

मनात कायम असे
किरण आशेचा ।
सदा आपल्या तोऱ्यात
असर तो नशेचा ।
मनात हाव वसलेली
धागा तो कशाचा ।
डाव फसतो कधी मग
येई राग हशाचा ।
Sanjay R.


" नशिबाचे फेरे "

काय रेखाटू या पाटीवर
काळी पाटी काळा खडू ।
नशीबाचेच फेरे उलटे 
जीवनात या सारेच कडू ।
टीचभर या पोटासाठी
हाता पायास किती छेडू ।
कोरभरच हवी भाकर
नको पेढे नको लाडू ।
अश्रू डोळ्यातले आटले
सांगा आता कसा रडू ।
Sanjay R.


Friday, August 6, 2021

" डोळ्यात थेंब आसवांचे "

आठवणींच्या डोहात
विचारांचे जाळे ।
डोळ्यात थेंब आसवांचे
पापणीच्या आड तळे ।
मन होते जेव्हा उदास
काय कुणास कळे ।
अंतरात धगधगते आग
मन मनात जळे ।
चन्द्र डोकावतो आकाशात
अंगणात त्याच्या खळे ।
चांदण्या दुरून हसतात
बघूनक मजला छळे ।
Sanjay R.