कसा जगायचा
जीवनाचा हा डाव ।
आयुष्यभर चाले
फक्त धावाधाव ।
कोण कुणाचा इथे
असले जरी नाव ।
हास्याच्या पलीकडे
रक्तबंबाळ घाव ।
डोळ्यात शोधा जरा
आसवांचा तिथे ठाव ।
Sanjay R.
Monday, August 2, 2021
" जीवनाचा हा डाव "
Saturday, July 31, 2021
" कुणास ते सांगायचे "
मनात किती विचार
कुणास ते सांगायचे ।
त्यातच जीव गुरफटतो
सांगा असेच का जगायचे ।
सुखाचे क्षण येतातच
गालात खूपच हासायचे ।
दुःखाचे क्षण येतिजाती
त्यानाही पार करायचे ।
Sanjay R.
Friday, July 30, 2021
रोपट्याचे झाड व्हावे
वाटे मज झाड लावावे
उठून सकाळी पाणी द्यावे ।
आलेत किती पाने उमलून
एक एक करून रोज मोजावे ।
रोपट्याचा मग हळूच छान
मोठे डेरेदार झाड व्हावे ।
बघून सारे सोबतीने माझ्या
गाली तुझ्या हास्य फुलावे ।
Sanjay R.
Thursday, July 29, 2021
" काय देऊ तुला "
काय देऊ तुला
नि घेऊ मी मला ।
मनात लोभ हा
कुठे कमी झाला ।
प्रेम कुठे व्यर्थ
लावू कसा ताला ।
मी तुझा तू माझी
मन दिले तुला ।
मन तुझे हवे
नको काही मला ।
Sanjay R.
Wednesday, July 28, 2021
" भाव बदलले चेहऱ्यावरचे "
येता आभाळ आकाशात
भाव बदलले चेहऱ्यावरचे ।
तळतळ करणारे उष्ण वारे
शीतल स्वरूप झाले त्यांचे ।
सर सर आल्या सरी धावून
मग वाहू लागले पाट पाण्याचे ।
निसर्गानेही मग रूप बदलले
अंथरले कुणी हे हिरवे गालिचे ।
दूर बसून मी कौतुक बघतो
दिवस सुंदर किती पावसाचे ।
Sanjay R.
Subscribe to:
Comments (Atom)