वाटे मज झाड लावावे
उठून सकाळी पाणी द्यावे ।
आलेत किती पाने उमलून
एक एक करून रोज मोजावे ।
रोपट्याचा मग हळूच छान
मोठे डेरेदार झाड व्हावे ।
बघून सारे सोबतीने माझ्या
गाली तुझ्या हास्य फुलावे ।
Sanjay R.
येता आभाळ आकाशात
भाव बदलले चेहऱ्यावरचे ।
तळतळ करणारे उष्ण वारे
शीतल स्वरूप झाले त्यांचे ।
सर सर आल्या सरी धावून
मग वाहू लागले पाट पाण्याचे ।
निसर्गानेही मग रूप बदलले
अंथरले कुणी हे हिरवे गालिचे ।
दूर बसून मी कौतुक बघतो
दिवस सुंदर किती पावसाचे ।
Sanjay R.