Friday, July 23, 2021

" सवयीचा गुलाम "

माणूस गुलाम या सवयीचा
स्वस्थ कसा तो बसेल ।
शोध घेतो हवे मग त्याचा
जवळ ते जर नसेल ।
कशाचीच मग नसते परवा
सामना संकटाशीही करेल ।
हवे म्हणजे हवेच असते
म्हणतो तुझ्या विना मी मरेल ।
क्षणोक्षणी असे तोच विचार
काय आयुष्य असच सरेल ।
जीवनाचा तर रंगच न्यारा
कोण जिंकेल कोण हरेल ।
Sanjay R.



" कळलं कसं नाही "

काखेत कळसा गावाला वळसा

म्हण सांगते काही नाही ते खोटं ।

कळलं कसं नाही, जवळ होतं सारं
हाव किती मजला मन किती छोटं ।

असेल त्याला जपा, नको ते सारा
विचार हवा थोडा मन हवं मोठं ।
Sanjay R.







Wednesday, July 21, 2021

" म्हणायला सारं सोपं असतं "

म्हणायला सारं 
सोपं असतं ।
करायलाच का 
जमत नसतं ।

तोरा मिरवायला 
तर हवं असतं ।
नकळत मग कधी 
काही फसतं ।

अशक्य असेल तर 
मनही रुसतं ।
मूर्ख पणावर बघा 
सारं जग हसतं ।
Sanjay R.

Tuesday, July 20, 2021

" मी नाही दूर "

तू आणि मी असू जिथे
आनंदाला उधाण तिथे ।

हास्य असे फुलेल तुझे
करील रिते मन माझे ।

नेत्रात तुझ्या भाव असा
वसलो मी त्यातच जसा ।

का मज वाटे ओढ अशी
शुद्ध हरपली तयात जशी ।

अंतरात तुझ्या मी नाही दूर
मिळव ताल तू जुळेल सूर ।
Sanjay R.

Monday, July 19, 2021

" परकं कसं वाटेल "

जिथे आहे आपलेपण
तिथे परकं कसं वाटेल ।
मनात भावनांचा गोंधळ
सांगायचंच मग सुटेल ।
नातं आपलं घट्ट किती
सांग ना कसं ते तुटेल ।
दृढ विचारांचं हे हृदय
नाही कधीच ते फुटेल ।
Sanjay R.