Wednesday, July 7, 2021

जाणार कुठे सोडून

जाणार कुठे सोडून सांग
मनात तर मीच असेल ।

दूर जरी जाशील ना तू
सांग जरा मी कुठे नसेल

विचारात मी आचारात मी

स्वप्नात ही तर मीच दिसेल ।

नकोच आता विचार कशाचा
सुख दुःख तर तसेच असेल ।
Sanjay R.


नाही कशालाच अर्थ

मनात अगणित विचार
नाही कशालाच अर्थ ।

करता विचार जरासा
नकळतच होते व्यर्थ ।

मार्ग जीवनाचा खडतर
ठिकठिकाणी दिसे स्वार्थ ।

हात दोन्ही जोडुनिया
करतात किती परमार्थ ।

अंतिम क्षणी कळते मग
होता त्यातही स्वार्थ ।
Sanjay R.




Monday, July 5, 2021

" दरी खोल अपयशाची "

दरी खोल किती
ही अपयशाची ।
नशिबात तीच
सोबत जीवनाची ।

पडतो उठतो
परत पडतो ।
पंख कुठे मज
तिथेच अडतो ।

किती अंधार तिथे

नाही प्रकाश ।
शोधतो एक किरण
दुर्गती आयुष्याची ।
Sanjay R.


Sunday, July 4, 2021

" येईना झोप "

सांगतो मी तुला
रात्रीची कथा ।
वाटत होते मला
पिटावा माथा ।

का कुणास ठाऊक
येईना झोप ।
वाटे मला झाला
कुणाचा कोप ।

सांगत होतो मला
झोप आता झोप ।
नाहीतर मिळेल
बाबांचा चोप ।

मन नव्हतं मानत
वाटत होती होप ।
येशील तू आणि
डागशील तोफ ।

तसे धाडधूम झाले
ठोक ठोक ठोक ।
उठून पाहिले तर
आई म्हणे झोप ।
Sanjay R.



Saturday, July 3, 2021

" उमजले मला "

उमजले मला
समजले मला
हवे होते काय
कळले मला ।

गंध कळ्यांचा
गजरा फुलांचा ।
केसांत मोगरा
हवा होता तुला ।

प्रेमाचा वारा
गगनातला तारा ।
पावसाच्या धारेत

भिजायच तुला ।

भावनांच्या तळ्यात
आनंदाच्या मळ्यात
हाती हात घेऊन
फिरायचं तुला ।

राजाची राणी
नको तिथे कोणी
लेऊन नवा साज
आहे नटायचं तुला ।
Sanjay R.