Wednesday, July 7, 2021
नाही कशालाच अर्थ
Monday, July 5, 2021
" दरी खोल अपयशाची "
दरी खोल किती
ही अपयशाची ।
नशिबात तीच
सोबत जीवनाची ।
पडतो उठतो
परत पडतो ।
पंख कुठे मज
तिथेच अडतो ।
किती अंधार तिथे
Sunday, July 4, 2021
" येईना झोप "
सांगतो मी तुला
रात्रीची कथा ।
वाटत होते मला
पिटावा माथा ।
का कुणास ठाऊक
येईना झोप ।
वाटे मला झाला
कुणाचा कोप ।
सांगत होतो मला
झोप आता झोप ।
नाहीतर मिळेल
बाबांचा चोप ।
मन नव्हतं मानत
वाटत होती होप ।
येशील तू आणि
डागशील तोफ ।
तसे धाडधूम झाले
ठोक ठोक ठोक ।
उठून पाहिले तर
आई म्हणे झोप ।
Sanjay R.
Saturday, July 3, 2021
" उमजले मला "
उमजले मला
समजले मला
हवे होते काय
कळले मला ।
गंध कळ्यांचा
गजरा फुलांचा ।
केसांत मोगरा
हवा होता तुला ।
प्रेमाचा वारा
गगनातला तारा ।
पावसाच्या धारेत
भिजायच तुला ।
भावनांच्या तळ्यात
आनंदाच्या मळ्यात
हाती हात घेऊन
फिरायचं तुला ।
राजाची राणी
नको तिथे कोणी
लेऊन नवा साज
आहे नटायचं तुला ।
Sanjay R.
" ठुमकत मुरडत जशी तू आली "
पारावर मी बसून होतो एकटा
हळूच कसा माझा हलला दुपट्टा ।
लागता चाहूल वळून मी पाहिले
हटेना नजर श्वास आतच राहिले ।
नाकात माझ्या भरला सुगन्ध
बघून तुला ग झालो मी धुंद ।
ठुमकत मुरडत जशी तू आली
फेकता नजर माझी तू झाली ।
कळला कसा तुज माझा इशारा
पदरान तुझ्या घालशील का वारा ।
धीर नको आता उशीर ग झाला
येतोच उद्या सांग तुझ्या बाला ।
पैसा नको नि दौलत ही नको
नेईल तुला लोक बघू दे लाखो ।
तुझी माझी जोडी होईल झ्याक
कळली ना तुला माझी ही हाक ।
Sanjay R.