Saturday, June 19, 2021

खूप झाले आता कंटाळा आला

खूप झाले आता
कंटाळा आला ।
सरत आले सारे
वेळही झाला ।
रोज तीच सकाळ
दिवसभर चाला ।
शांती साठी रात्री
लावा चाबी ताला ।
स्वप्नही देती त्रास
जिवनाचाच काला ।
संपू दे आता सारं
होईल मी तारा ।
Sanjay R.


Friday, June 18, 2021

" कुणाला काय सांगायचं "

कुणाला काय सांगायचं
सारेच समजूतदार इथे ।
थोडा प्रयत्न करून बघा
तुम्हा जवाब मिळेल तिथे ।

प्रत्येकाचे विचार वेगळे
गुणही मग जुळतात कुठे ।
सारे सामोपचाराने घ्यायचे
नाहीतर नाते गोते सारे तूटे ।

मला नाही गरज कुणाची
चिंता कुणाची कुणास इथे ।
जायचे तर साऱ्यांनाच आहे
विचारच नाही भेटायचा तिथे ।
Sanjay R.

Thursday, June 17, 2021

" करावे काय कळत नाही "

धाय मोकलून रडतोय पाऊस

करावे के कळत नाही ।
कींकाळ्याही ढगांच्या किती
सरता सरत नाहीत ।
मधेच डोळे दिपवणारी वीज येते
घाबरवल्या विना राहत नाही ।
निसर्गाची हीही एक तऱ्हा
जीवनाचा अंत होऊ देत नाही ।
आभार मानायचे तर कुणाचे
पावसाविना तर काहीच होत नाही ।
Sanjay R.



माझ्या लेखनाला मिळालेले प्रोत्साहन

आयोजकांचे आभार 💐

















" आठवणी "

आहेत मनात किती
आठवणी तुझ्या माझ्या ।
डोळ्यापुढे येती साऱ्या
जशा चमचमत्या विजा ।
बरसण्या थेंब आसवांचे
होती ढग डोळ्यात जमा ।
आठवण होता क्षणात
पडती गालावरून धारा ।
Sanjay R.