Thursday, June 17, 2021

" करावे काय कळत नाही "

धाय मोकलून रडतोय पाऊस

करावे के कळत नाही ।
कींकाळ्याही ढगांच्या किती
सरता सरत नाहीत ।
मधेच डोळे दिपवणारी वीज येते
घाबरवल्या विना राहत नाही ।
निसर्गाची हीही एक तऱ्हा
जीवनाचा अंत होऊ देत नाही ।
आभार मानायचे तर कुणाचे
पावसाविना तर काहीच होत नाही ।
Sanjay R.



माझ्या लेखनाला मिळालेले प्रोत्साहन

आयोजकांचे आभार 💐

















" आठवणी "

आहेत मनात किती
आठवणी तुझ्या माझ्या ।
डोळ्यापुढे येती साऱ्या
जशा चमचमत्या विजा ।
बरसण्या थेंब आसवांचे
होती ढग डोळ्यात जमा ।
आठवण होता क्षणात
पडती गालावरून धारा ।
Sanjay R.

Tuesday, June 15, 2021

" सांग जरा मला "

सांग जरा रे मला
तुझ्या मनात काय ।
दिवस किती झाले
तुझे दर्शनच नाय ।
तळमळतो जीव
आता करू मी काय ।
येऊ देना पंढरीला
वारी चुकते की काय ।
डोळे भरून पाहिलं
धरील तुझे देवा पाय ।
Sanjay R.

Monday, June 14, 2021

" स्वप्नांची एक दुनिया "

स्वप्नांची एक दुनिया
आनंदाची ती किमया ।
बघतो मी मोहक माया
काय वर्ण काय काया ।
सुवर्णाची त्यावर छाया
चमचमणारा रत्न पाया ।
म्हणे अप्सरा माझे राया
मन हरपले गेलो वाया ।
Sanjay R.