Thursday, June 17, 2021

" आठवणी "

आहेत मनात किती
आठवणी तुझ्या माझ्या ।
डोळ्यापुढे येती साऱ्या
जशा चमचमत्या विजा ।
बरसण्या थेंब आसवांचे
होती ढग डोळ्यात जमा ।
आठवण होता क्षणात
पडती गालावरून धारा ।
Sanjay R.

Tuesday, June 15, 2021

" सांग जरा मला "

सांग जरा रे मला
तुझ्या मनात काय ।
दिवस किती झाले
तुझे दर्शनच नाय ।
तळमळतो जीव
आता करू मी काय ।
येऊ देना पंढरीला
वारी चुकते की काय ।
डोळे भरून पाहिलं
धरील तुझे देवा पाय ।
Sanjay R.

Monday, June 14, 2021

" स्वप्नांची एक दुनिया "

स्वप्नांची एक दुनिया
आनंदाची ती किमया ।
बघतो मी मोहक माया
काय वर्ण काय काया ।
सुवर्णाची त्यावर छाया
चमचमणारा रत्न पाया ।
म्हणे अप्सरा माझे राया
मन हरपले गेलो वाया ।
Sanjay R.

Sunday, June 13, 2021

" मनातलं ओळखतो मी "

मनातलं ओळखतो मी
नको सांगूस तू काही ।
दूर नाहीत सुयोग आता
ऐकून घे सांगतो काही ।
फक्त होकाराची वाट आहे
बोलू नकोस नाही नाही ।
तू आणि मी, मी आणि तू
चल हसू या दिवस काही ।
Sanjay R.









Saturday, June 12, 2021

" डोळ्यात माझ्या भाव नवे "

डोळ्यात माझ्या भाव नवे
सांग मजला तुज काय हवे ।
विस्तीर्ण किती आकाश सवे
लक्षवेधी तिथे पक्षांचे थवे ।
 नभ एक काळा मधेच डोकावे
होऊन पाऊस का त्याने यावे ।
अंथरतो मग तो ओली चादर
वाटे मज त्यात भिजून घ्यावे ।
मग होऊन अंकुर हळूच यावे
पसरूनी हिरवळ निसर्ग व्हावे ।
वाऱ्यासंगे मग थोडे झुलावे
फुल होऊन मीही बहारावे ।
Sanjay R.