स्वप्नांची एक दुनिया
आनंदाची ती किमया ।
बघतो मी मोहक माया
काय वर्ण काय काया ।
सुवर्णाची त्यावर छाया
चमचमणारा रत्न पाया ।
म्हणे अप्सरा माझे राया
मन हरपले गेलो वाया ।
Sanjay R.
आकाशात आले ढग
सूर्य शोधतो आडोसा ।
ताप झाला कसा शांत
पाऊस रडतो ढसाढसा ।
आसवे गळती सुखाची
बीज घेई अंकुराचा वसा ।
रोपटे येईल मग फुलून
बघून हिरवळ थोडे हसा ।
फुटेल पालवी मनाला
खूप आनंदी सारे दिसा ।
Sanjay R.