Friday, June 11, 2021

" जीव गुंतला तुझ्यात "

जीव गुंतला तुझ्यात
विचार तुझाच मनात ।
हरली तहान भूक
तस्वीर तुझी डोळ्यात ।
बोलके तुझे ग डोळे
डुबलो मी तयात ।
बोल तुझे ऐकताच
होतो मी आनंदित ।
चाहूल तुझी लागता
होतो किती प्रफुल्लित ।
तुझ्या विनाचा विचार
नकोच कधी मनात ।
भावना ही मनातली
सांगतो तुझ्या कानात ।
गुंतला जीव माझा
सांगतो फक्त तुझ्यात ।
प्रेमाचे हे भाव सांग
मावेल कसे कागदात ।
तुझ्या माझ्या प्रेमाचे
बळ नाहीच कशात ।
Sanjay R.

Thursday, June 10, 2021

" आकाशात आले ढग "

आकाशात आले ढग
सूर्य शोधतो आडोसा ।
ताप झाला कसा शांत
पाऊस रडतो ढसाढसा ।
आसवे गळती सुखाची
बीज घेई अंकुराचा वसा ।
रोपटे येईल मग फुलून
बघून हिरवळ थोडे हसा ।
फुटेल पालवी मनाला
खूप आनंदी सारे दिसा ।
Sanjay R.


" बघू किती मी वाट "

बघू किती मी वाट
सांग तुझ्या मेसेजची ।

नजर सारखी मोबाईलवर
लिंकच तुटली नेटवर्कची ।

चार्जिंगही आले सरत
बत्तीही बंद या विजेची ।

जुनेच मेसेज वाचतो आता
तहान ताकावर दुधाची ।
Sanjay R.


Monday, June 7, 2021

" माझे बाबा माझे हिरो "

तुम्ही बाबा माझे हिरो
बघून वाटते मी तर झिरो ।

पावलावर पाउल मी ठेऊन
गिरवतो कित्ता नाव घेऊन ।

स्वप्न तुमच्यासारखे व्हायचे
हवेत आशीर्वाद मला तुमचे ।

म्हणतात बापसे बेटा सवाई
असेच होऊ दे म्हणते माई ।

देवाकडे मागतो मी एकच
विचार माझे असू दे नेकच ।

नावाला तुमच्या देईल झळाळी
कष्ट करील आता माझी पाळी ।
Sanjay R.


" तुजपुढे आम्ही लाचार "

देवा किती तुझे उपकार
आम्हा तुझाच रे आधार ।

संकटात येतोस धावून
उचलतो दुःखाचा भार ।

ठेवितो सुखात आम्हा
हाती तुझ्या सारा संसार ।

सांग कशी होईल परतफेड
तुजपुढे आम्ही सारे लाचार ।

धावा करतो संकटात तुझा
मार्ग सुखाचा करतो साकार ।

मनी दर्शनाची ओढ आता
देऊ नकोस रे तू नकार  ।
Sanjay R.