Friday, May 28, 2021

" आता काहीच नाही सुचत "

" व्यथा एका रुग्णाची "

बेडवरच आहे मी पडून
नाही काहीच आता सुचत ।

सारखे मनात येतात विचार
वाटतं आता नाही मी वाचत ।

आयुष्यभर कष्ट करून हो
थोडीशी केली होती बचत ।

सरली सारी या दवाखान्यात 
मनही चालले आता खचत ।

उशाखाली जरा बघा माझ्या
बिलं कशी चालली साचत ।

जीवनाचाच हो खेळ  झाला 
भूत कोरोनाचे आहे नाचत ।
Sanjay R.


Thursday, May 27, 2021

" आपुलकी तर कायम राहील "

मतांमध्ये जरी असतील भेद
आपुलकी तर कायम राहील ।

दूर जरी तू गेलीस कितीही
अंतरातच मग तुला पाहिल ।

आहे देव कुठे कुणास ठाऊक
पुष्प प्रतिमेस रोज वाहील ।

भाव तुझ्यावर जडला माझा
तुझ्या शिवाय कसा जाईल ।
Sanjay R.



Wednesday, May 26, 2021

" सांगतो मी परत "

सांगतो मी परत
काय तुझे इरादे ।
विसरलीस कशी तू
केलेले सारेच वादे ।
विसरेल कसा मी
अंतरातली ती यादे ।
आठवण कर जरासी
उजळा स्मृतींना तू दे ।
म्हणायचीस कृष्ण मी
 व्हायचीस तू राधे ।
Sanjay R.


Tuesday, May 25, 2021

" बघू नको रे वळून मागे "

जायचे असते पुढे पुढे
बघू नको रे वळून मागे ।


सरत नाही वाट कधी ही
आकाशात आभाळ जागे ।

समोर चाले ती धाव त्यांची
सुसाट वाराच जोडी धागे ।

Sanjay R.


Monday, May 24, 2021

" मनावर सय्यम माझा "

सोडू नकोस ताबा
मनावर सय्यम माझा ।
सुचेना मजला काही
जीव तुजवर माझा ।
बघतो स्वप्न किती मी
वाटे त्यात मीच राजा ।
राणी तू ग आहे माझी
मनात भाव नाही दुजा ।
Sanjay R.