Tuesday, May 25, 2021

" बघू नको रे वळून मागे "

जायचे असते पुढे पुढे
बघू नको रे वळून मागे ।


सरत नाही वाट कधी ही
आकाशात आभाळ जागे ।

समोर चाले ती धाव त्यांची
सुसाट वाराच जोडी धागे ।

Sanjay R.


Monday, May 24, 2021

" मनावर सय्यम माझा "

सोडू नकोस ताबा
मनावर सय्यम माझा ।
सुचेना मजला काही
जीव तुजवर माझा ।
बघतो स्वप्न किती मी
वाटे त्यात मीच राजा ।
राणी तू ग आहे माझी
मनात भाव नाही दुजा ।
Sanjay R.

Sunday, May 23, 2021

" आवडती माझी शाळा "

अजूनही आहे मला
तिचा खूप लळा ।
दुसरी कोणी नाही ती
आहे माझीच शाळा ।
वेळ होताच शाळेची
व्हायची पळा पळा ।
प्रार्थनेसाठी ग्राउंड वर
व्हायचे सारे गोळा ।
नंतर व्हायचे पिरेड
नियम गुरुजींचे पाळा ।
दंगा मस्ती करतच मग
अभ्यासाकडे वळा ।
चुकवण्या मार गुरुजींचा
नको ते सारे टाळा ।
नसेल केला अभ्यास तर
मित्रांना खूप छळा ।
नसेल केला गृहपाठ तर
कोरडा पडायचा गळा ।
तरीही शाळेचा आम्हास
होता खूपच लळा ।
Sanjay R.

Saturday, May 22, 2021

" करू मी पर्वा कशाची "

करू मी पर्वा कशाची
अवस्था कशी मनाची ।
असंख्य विचारांचे चक्र
वेळच नाही थांबायची ।
गुरफटलेले मी हा असा
वाट मिळेना निघायची ।
आहे क्षितिज दूर किती
इच्छा आहे चालायची ।
साथ हवी तुझीच मज
सम्पेल वाट जीवनाची ।
Sanjay R.


Friday, May 21, 2021

" अलिप्त कसं जगायचं "

अलिप्त कसं जगायचं 
दूर जरा कसं जायचं  ।
मनात प्रीतीचा आहे गंध
कसं त्यास समजवायचं ।
होते जाणीव मला सारी
सांग तुला कसं सांगायचं ।
ओठात शब्दांचे भांडार
बोल ते कसे थांबवायचे ।
नेत्रही आहेत आतुर किती 
नजरेला किती झाकायचं ।
सोडून सारेच विचार मग
चला जीवन छान जगायचं ।
Sanjay R.