करू मी पर्वा कशाची
अवस्था कशी मनाची ।
असंख्य विचारांचे चक्र
वेळच नाही थांबायची ।
गुरफटलेले मी हा असा
वाट मिळेना निघायची ।
आहे क्षितिज दूर किती
इच्छा आहे चालायची ।
साथ हवी तुझीच मज
सम्पेल वाट जीवनाची ।
Sanjay R.
अपेक्षा कशाची आता करावी
काटेरी वाटेवर फुले उमलावी ।
रणरणत्या उन्हात फिरताना
वाऱ्याची थंड झुळूक यावी ।
घामाने ओथंम्बलेल्या शरीरावर
निसर्गाने फुंकर हळूच घालावी ।
कष्टाने थकलेले अवघे शरीर
नवचैतन्याने मग फुलून जावे ।
Sanjay R.