Friday, May 21, 2021

" अलिप्त कसं जगायचं "

अलिप्त कसं जगायचं 
दूर जरा कसं जायचं  ।
मनात प्रीतीचा आहे गंध
कसं त्यास समजवायचं ।
होते जाणीव मला सारी
सांग तुला कसं सांगायचं ।
ओठात शब्दांचे भांडार
बोल ते कसे थांबवायचे ।
नेत्रही आहेत आतुर किती 
नजरेला किती झाकायचं ।
सोडून सारेच विचार मग
चला जीवन छान जगायचं ।
Sanjay R.

Thursday, May 20, 2021

" अपेक्षा कशाची आता करावी "

अपेक्षा कशाची आता करावी
काटेरी वाटेवर फुले उमलावी ।

रणरणत्या उन्हात फिरताना
वाऱ्याची थंड झुळूक यावी ।

घामाने ओथंम्बलेल्या शरीरावर
निसर्गाने फुंकर हळूच घालावी ।

कष्टाने थकलेले अवघे शरीर
नवचैतन्याने मग फुलून जावे ।
Sanjay R.


Wednesday, May 19, 2021

" तगमग ही जीवघेणी "

तगमग ही किती जीवघेणी
आहे अंतरात एक कहाणी ।
विचारांच्या पुरात वाहते
गालावर डोळ्यातले पाणी ।
दुःखात ही हसायचे कसे
हेच जीवन प्रत्येक क्षणी ।
Sanjay R.


Monday, May 17, 2021

" कर ना काही तू खुलासा "

कर ना काही तू खुलासा
मिळेल मज मग दिलासा ।
प्रश्नांचे चक्र फिरते डोक्यात
सांगा स्वस्थ बसू मी कसा ।
जीवनाच्या गणिताचा हा खेळ
मांडला तुजपुढे जसाच्या तसा ।
जीवनाच्या खेळात धैर्य हवे थोडे
सोडू नको डाव मधेच तू असा ।
क्षण सुख दुःखाचे येती जाती
आसवा सोबत हवा थोडा हसा ।
Sanjay R.

Sunday, May 16, 2021

" वेळ कुठे थांबतो "

वेळ कुठे हो थांबतो
पुढे पुढेच  तो जातो ।
आठवणी कालच्या
ठेऊन मागे जातो ।
होते काल जसे
दिवस उद्याचा नसतो ।
रूप रंग घेऊन वेगळे
उदय सूर्याचा होतो ।
चंद्रही रोजच आपले
रूप कसे बदलतो ।
पण आशेचा एक किरण
रंग जीवनात उधळतो ।
Sanjay R.