Wednesday, May 19, 2021

" तगमग ही जीवघेणी "

तगमग ही किती जीवघेणी
आहे अंतरात एक कहाणी ।
विचारांच्या पुरात वाहते
गालावर डोळ्यातले पाणी ।
दुःखात ही हसायचे कसे
हेच जीवन प्रत्येक क्षणी ।
Sanjay R.


Monday, May 17, 2021

" कर ना काही तू खुलासा "

कर ना काही तू खुलासा
मिळेल मज मग दिलासा ।
प्रश्नांचे चक्र फिरते डोक्यात
सांगा स्वस्थ बसू मी कसा ।
जीवनाच्या गणिताचा हा खेळ
मांडला तुजपुढे जसाच्या तसा ।
जीवनाच्या खेळात धैर्य हवे थोडे
सोडू नको डाव मधेच तू असा ।
क्षण सुख दुःखाचे येती जाती
आसवा सोबत हवा थोडा हसा ।
Sanjay R.

Sunday, May 16, 2021

" वेळ कुठे थांबतो "

वेळ कुठे हो थांबतो
पुढे पुढेच  तो जातो ।
आठवणी कालच्या
ठेऊन मागे जातो ।
होते काल जसे
दिवस उद्याचा नसतो ।
रूप रंग घेऊन वेगळे
उदय सूर्याचा होतो ।
चंद्रही रोजच आपले
रूप कसे बदलतो ।
पण आशेचा एक किरण
रंग जीवनात उधळतो ।
Sanjay R.

Saturday, May 15, 2021

" झुळूक शीतल वाऱ्याची "

चाहूल तुझी मज वाटे
झुळूक शीतल वाऱ्याची ।
सहवास तुझा भासे जणू
सुखद रात्र ती ताऱ्यांची ।

श्वास होतो हळुवार मग
मिटते पापणी डोळ्याची ।
स्वप्नवत मी बघतो तुला
आठवण तुझ्या असण्याची ।

आठवतो मज तो मोगरा
होते जाणीव सुगंधाची ।
तूच फुलते मनात माझ्या
राणी तू माझ्या जीवनाची ।
Sanjay R.

Friday, May 14, 2021

" तुझ्या शिवाय जमणार नाही "

जाऊ नको माहेरी
तुझ्याशिवाय जमणार नाही ।
राग तुझा घालवू कसा
वाद मी करणार नाही ।
भावना तुझ्या कळल्या
दुःख तुला देणार नाही ।
नेहमी तू हसत राहा
हसेल सोबत तुझ्या मीही ।
दागिने हवे की साडी
मन तुझे मोडणार नाही ।
सोन्या नाण्याची हौस तुझी
पगारात माझ्या जमवेल काही ।
जमेल ते मी करेल सारे
रुसू तुला मी देणार नाही ।
प्रेमात तुझ्या वेडा मी
प्रेम कधी सोडणार नाही ।
सासर माहेर तुझेच घर
पण मी सासरी येणार नाही ।
तू पण तिथे नको जाऊस
इथेच आपण करू काही ।
Sanjay R.