वेळ कुठे हो थांबतो
पुढे पुढेच तो जातो ।
आठवणी कालच्या
ठेऊन मागे जातो ।
होते काल जसे
दिवस उद्याचा नसतो ।
रूप रंग घेऊन वेगळे
उदय सूर्याचा होतो ।
चंद्रही रोजच आपले
रूप कसे बदलतो ।
पण आशेचा एक किरण
रंग जीवनात उधळतो ।
Sanjay R.
जाऊ नको माहेरी
तुझ्याशिवाय जमणार नाही ।
राग तुझा घालवू कसा
वाद मी करणार नाही ।
भावना तुझ्या कळल्या
दुःख तुला देणार नाही ।
नेहमी तू हसत राहा
हसेल सोबत तुझ्या मीही ।
दागिने हवे की साडी
मन तुझे मोडणार नाही ।
सोन्या नाण्याची हौस तुझी
पगारात माझ्या जमवेल काही ।
जमेल ते मी करेल सारे
रुसू तुला मी देणार नाही ।
प्रेमात तुझ्या वेडा मी
प्रेम कधी सोडणार नाही ।
सासर माहेर तुझेच घर
पण मी सासरी येणार नाही ।
तू पण तिथे नको जाऊस
इथेच आपण करू काही ।
Sanjay R.