Friday, May 14, 2021

" तुझ्या शिवाय जमणार नाही "

जाऊ नको माहेरी
तुझ्याशिवाय जमणार नाही ।
राग तुझा घालवू कसा
वाद मी करणार नाही ।
भावना तुझ्या कळल्या
दुःख तुला देणार नाही ।
नेहमी तू हसत राहा
हसेल सोबत तुझ्या मीही ।
दागिने हवे की साडी
मन तुझे मोडणार नाही ।
सोन्या नाण्याची हौस तुझी
पगारात माझ्या जमवेल काही ।
जमेल ते मी करेल सारे
रुसू तुला मी देणार नाही ।
प्रेमात तुझ्या वेडा मी
प्रेम कधी सोडणार नाही ।
सासर माहेर तुझेच घर
पण मी सासरी येणार नाही ।
तू पण तिथे नको जाऊस
इथेच आपण करू काही ।
Sanjay R.





Thursday, May 13, 2021

" वारा ही स्तब्ध होतो "

सम्पताच वादळ मोठे
वारा ही स्तब्ध होतो ।
उपद्व्याप काय केले
आढावा त्याचा घेतो ।
उडालेले घराचे छत
धाराशाई झालेली झाडे ।
काळजी ने ग्रस्त माणसे
त्यांच्या डोळ्यातली आसवे ।
चिव चिव करणारी पाखरे
आडोसा शोधणारे जीव ।
मावळलेल्या आशा
पदरात असलेली निराशा ।
लागतो वेळ थोडा पण
सवरतात दुःखातून सारे
परत वाहतात निशब्द वारे ।
Sanjay R.


Wednesday, May 12, 2021

" ठरवले जे मनात काही "

ठरवले जे मनात काही
सुरळीत ते होतच नाही  ।
अवस्था मनाची त्राही त्राही
विचारांची तर होते लाही ।
वेदना साऱ्या दिशा दाही
दुःख कुणाचे कोण पाही ।
जगतो कुणी जीवन शाही
मरतो गरीब याची देही ।
Sanjay R.

Tuesday, May 11, 2021

" उगाचच होतात भास "

उगीचच होतात भास
मग संथ होतात श्वास ।
दरदरून फुटतो घाम
होतो जीवाला त्रास ।
स्वप्नांची असते दुनिया
नको नको ते आभास ।
तडफड चालते माझी
सोडवून घेण्याचे प्रयास ।
गळ्याला पडते कोरड
आवळतो कुणीतरी फास ।
का कशाला होते असे
लागतो एकच ध्यास ।
उलगडता उलगडत नाही
काय रहस्य असावे त्यास ।
स्वप्नातल्या आकृत्यांचा
कशासाठी असतो हव्यास ।
विचारांचा असावा खेळ
तुटतो माझ्यातलाच विश्वास ।
Sanjay R.


" डोळे मिटून पाहताना "

डोळे मिटून बघतो
माझा मीच  मला ।
अंधार दाटतो पुढ्यात
दिसेल कसे तुला ।

वर खाली  होतो जेव्हा
अंतर मनातला झुला  ।
विचारांचे ढग येतात 
मी मात्र होतो खुला ।

आकृती एक फेर धरते
वेगळाच असतो ताल ।
धारातीर्थी पडतो देह
नका विचारू माझे हाल ।
Sanjay R.