उगीचच होतात भास
मग संथ होतात श्वास ।
दरदरून फुटतो घाम
होतो जीवाला त्रास ।
स्वप्नांची असते दुनिया
नको नको ते आभास ।
तडफड चालते माझी
सोडवून घेण्याचे प्रयास ।
गळ्याला पडते कोरड
आवळतो कुणीतरी फास ।
का कशाला होते असे
लागतो एकच ध्यास ।
उलगडता उलगडत नाही
काय रहस्य असावे त्यास ।
स्वप्नातल्या आकृत्यांचा
कशासाठी असतो हव्यास ।
विचारांचा असावा खेळ
तुटतो माझ्यातलाच विश्वास ।
Sanjay R.
Tuesday, May 11, 2021
" उगाचच होतात भास "
" डोळे मिटून पाहताना "
डोळे मिटून बघतो
माझा मीच मला ।
अंधार दाटतो पुढ्यात
दिसेल कसे तुला ।
वर खाली होतो जेव्हा
अंतर मनातला झुला ।
विचारांचे ढग येतात
मी मात्र होतो खुला ।
आकृती एक फेर धरते
वेगळाच असतो ताल ।
धारातीर्थी पडतो देह
नका विचारू माझे हाल ।
Sanjay R.
Sunday, May 9, 2021
" तुझे ते हक्काने रुसणे "
कळतं ना मला
तुझं ते हक्काने रुसणे ।
दाखवण्या तुझा राग
कोपऱ्यात जाऊन बसणे ।
आसवांचे थेंब डोळ्यात
मुसमुसुन मग ते रडणे ।
करा कितीही मिणत्या
रोखून डोळे फक्त बघणे ।
हवे ते काढून घेताच
हळूच गालात हसणे ।
नाक मुरडत मग
वेड्यात मलाच काढणे
विजयाच्या अविर्भावात
डोस उपदेशाचे पाजणे ।
सारेच आवडते मला
रोजचे नवीन बहाणे ।
Sanjay R.
Saturday, May 8, 2021
" विरह सरता सरेना "
होईना सहन मजला
उणीव तुझीच भरेना ।
अंतरी तुझाच विचार
विरह सरता सरेना ।
आठवणी उरल्या आता
विचार मनाचे थांबेना ।
ये परत तू परतुनी
श्वास तुझ्याविना चालेना ।
नौका जीवनाची अडली
तुझ्या विना तीही हालेना ।
Sanjay R.
Friday, May 7, 2021
" मनात तुझ्या काय "
मनात तुझ्या काय
आज तरी सांग ना
जाऊ नकोस दूर तू
जरा थोडसं थांब ना
वाटेवर असतात डोळे
भिरभिरत असते नजर ।
वाटते तूच ती असावी
नि हृदयात वाजतो गजर ।
होतील संथ जरी श्वास
पण मी थकणार नाही ।
आस तुझीच आहे मनात
मनही देतं त्याला ग्वाही ।
दिवस सरो वा रात्री किती
तुझ्यासाठीच जगतो मी ।
तू आली की वाटेल बरे
इच्छा शेवटची आहे ही ।
Sanjay R.
Subscribe to:
Comments (Atom)