होईना सहन मजला
उणीव तुझीच भरेना ।
अंतरी तुझाच विचार
विरह सरता सरेना ।
आठवणी उरल्या आता
विचार मनाचे थांबेना ।
ये परत तू परतुनी
श्वास तुझ्याविना चालेना ।
नौका जीवनाची अडली
तुझ्या विना तीही हालेना ।
Sanjay R.
दूर किती मी या परदेशी
प्रकुर्ती आई तुझी ग कशी ।
बाबा आहेत ना ठीक
कोरोनाने गमावली खुशी ।
लागली एकच काळजी
हालचाल कुणाची कशी ।
विचारतो मी देवाला
जाईल कधी आई पाशी ।
नाळ जुळली आहे जिथे
नाते माझे आहे त्या घराशी ।
रात्र असते विचारांची
डोळे पुसून ओली होते उशी ।
येतील कधी परत ते दिवस
भेटीसाठी भुकेला मी उपाशी ।
सांभाळून घेशील ना तू देवा
करतो याचना मी तुजपाशी ।
Sanjay R.
मनातल्या भावना माझ्या
मांडू कशा मी शब्दात ।
काय लिहिले भगवंताने
कळेना मज प्रारब्धात ।
आला दिवस सरतो कसा
कळेना या आयुष्यात ।
प्रवास तर निरंतर चालला
थांबेल कधीही क्षणात ।
सूर्य चंद्र आणि नक्षत्र
येती जाती रोजच गगनात ।
चित्र बदलते या धरेवरचे
निसर्गाच्या काय मनात ।
पूर पाणी कधी महामारी
आघात होती माणसात ।
खांदाही दुर्लभ कधी
उरलेच काय या जीवनात ।
Sanjay R.