Friday, May 7, 2021

" मनात तुझ्या काय "

मनात तुझ्या काय
आज तरी सांग ना
जाऊ नकोस दूर तू
जरा थोडसं थांब ना

वाटेवर असतात डोळे
भिरभिरत असते नजर ।
वाटते तूच ती असावी
नि हृदयात वाजतो गजर ।

होतील संथ जरी श्वास
पण मी थकणार नाही ।
आस तुझीच आहे मनात
मनही देतं त्याला ग्वाही ।

दिवस सरो वा रात्री किती
तुझ्यासाठीच जगतो मी ।
तू आली की वाटेल बरे
इच्छा शेवटची आहे ही ।
Sanjay R.

Thursday, May 6, 2021

" सांभाळून घेशील तू "

दूर किती मी या परदेशी
प्रकुर्ती आई तुझी ग कशी ।
बाबा आहेत ना ठीक
कोरोनाने गमावली खुशी ।
लागली एकच काळजी
हालचाल कुणाची कशी ।
विचारतो मी देवाला
जाईल कधी आई पाशी ।
नाळ जुळली आहे जिथे
नाते माझे आहे त्या घराशी ।
रात्र असते विचारांची
डोळे पुसून ओली होते उशी ।
येतील कधी परत ते दिवस
भेटीसाठी भुकेला मी उपाशी ।
सांभाळून घेशील ना तू देवा
करतो याचना मी तुजपाशी ।
Sanjay R.




Wednesday, May 5, 2021

" उशिरा का होईना "

उशिरा का होईना पण
झाले सारेच सुरळीत ।
होती किती हो चिंता
सगळेच होते काळजीत ।
लग्न जुळेना किशोरचे
बघायचा मग तो शून्यात ।
सूर्याच्या किरणासोबत
किणकिणला फोन सुरात ।
आनंदी झाले वातावरण
हसले सारेच मग घरात ।
बातमी होती आनंदाची
येणार पाहुणी होती दारात ।
लग्न जुळले किशोरचे
बाकी उरली आता वरात ।
मग दिवस आला लग्नाचा
पण बंद सारे कोरोनात ।
घरी उदास झाले सारेच
मनच लागेना मग कशात ।
कशीबशी भरली एक गाडी
विसच जण होते लग्नात ।
नवी नवरी आली हो घरी
बघा किशोर किती आनंदात ।
मिटली सगळ्यांची काळजी
आणी जीव पडला भांड्यात ।
Sanjay R.



Tuesday, May 4, 2021

" मांडू कसे मी शब्दात "

मनातल्या भावना माझ्या
मांडू कशा मी शब्दात ।
काय लिहिले भगवंताने
कळेना मज प्रारब्धात ।
आला दिवस सरतो कसा
कळेना या आयुष्यात ।
प्रवास तर निरंतर चालला
थांबेल कधीही क्षणात ।
सूर्य चंद्र आणि नक्षत्र
येती जाती रोजच गगनात ।
चित्र बदलते या धरेवरचे
निसर्गाच्या काय मनात ।
पूर पाणी कधी महामारी
आघात होती माणसात ।
खांदाही दुर्लभ कधी
उरलेच काय या जीवनात ।
Sanjay R.


Monday, May 3, 2021

" सांग जरा निरोप माझा "

वाळूचे  ते होते घर
लाटेसह गेले वाहून ।
किनारा सागराचा
निघाला कसा न्हाऊन ।

स्वच्छ झाला काठ
मन हसले ते पाहून ।
परत एक लाट येता
सारेच तिथे गेले राहून ।

लाटे मागे लाट येते
किती कशी ती धावून ।
सांग जरा निरोप माझा
येणार परत मीही जाऊन ।
Sanjay R.