मनातल्या भावना माझ्या
मांडू कशा मी शब्दात ।
काय लिहिले भगवंताने
कळेना मज प्रारब्धात ।
आला दिवस सरतो कसा
कळेना या आयुष्यात ।
प्रवास तर निरंतर चालला
थांबेल कधीही क्षणात ।
सूर्य चंद्र आणि नक्षत्र
येती जाती रोजच गगनात ।
चित्र बदलते या धरेवरचे
निसर्गाच्या काय मनात ।
पूर पाणी कधी महामारी
आघात होती माणसात ।
खांदाही दुर्लभ कधी
उरलेच काय या जीवनात ।
Sanjay R.
Tuesday, May 4, 2021
" मांडू कसे मी शब्दात "
Monday, May 3, 2021
" सांग जरा निरोप माझा "
वाळूचे ते होते घर
लाटेसह गेले वाहून ।
किनारा सागराचा
निघाला कसा न्हाऊन ।
स्वच्छ झाला काठ
मन हसले ते पाहून ।
परत एक लाट येता
सारेच तिथे गेले राहून ।
लाटे मागे लाट येते
किती कशी ती धावून ।
सांग जरा निरोप माझा
येणार परत मीही जाऊन ।
Sanjay R.
Sunday, May 2, 2021
" नजरच गेली सांगून '
नजरच गेली सांगून
मनात काय तुझ्या ।
नजरेस नजर मिळता
मनास कळले माझ्या ।
विचार मनात माझ्या
मनात तुझ्या मी आहे ।
विचार असतो तुझा
झरा प्रीतीचा वाहे ।
समोर असते तू जेव्हा
सुचेना मजला काही ।
आठवण जेव्हा येता
शोधतो तुज दिशा दाही ।
Sanjay R.
Saturday, May 1, 2021
" धुंद हा गारवा "
सुखद ही हवा
धुंद हा गारवा ।
उत्साह वाटे जेव्हा
फुलते मन तेव्हा ।
पहाटेचा सूर्य नवा
निघाला पक्षांचा थवा ।
कोकीळ गाई गाणे
मधुर तिचा पावा ।
Sanjay R.
Friday, April 30, 2021
" सळसळ सळसळ आला वारा "
सळसळ सळसळ आला वारा
सोबतीला आल्या पाऊस धारा ।
क्षणभर पावसात भिजली धरा
गधं मातीचा दरवळला जरा ।
जेव्हा आकाशात चमचमतो तारा
येता आभाळ लुप्त होतो तो सितारा ।
दडून ढगांच्या आड देतो तो पहारा
पडतो मग पाऊस समजून इशारा ।
हसते कळी आणी फुलवते पिसारा
मन मोहून घेई मग सारा नजारा ।
Sanjay R.
Subscribe to:
Posts (Atom)