Sunday, May 2, 2021

" नजरच गेली सांगून '

नजरच गेली सांगून
मनात काय तुझ्या ।
नजरेस नजर मिळता
मनास कळले माझ्या ।

विचार मनात माझ्या
मनात तुझ्या मी आहे ।
विचार असतो तुझा
झरा प्रीतीचा वाहे ।

समोर असते तू जेव्हा
सुचेना मजला काही ।
आठवण जेव्हा येता
शोधतो तुज दिशा दाही ।
Sanjay R.

Saturday, May 1, 2021

" धुंद हा गारवा "

सुखद ही हवा
धुंद हा गारवा ।
उत्साह वाटे जेव्हा
फुलते मन तेव्हा ।
पहाटेचा सूर्य नवा
निघाला पक्षांचा थवा ।
कोकीळ गाई गाणे
मधुर तिचा पावा ।
Sanjay R.


Friday, April 30, 2021

" सळसळ सळसळ आला वारा "

सळसळ सळसळ आला वारा
सोबतीला आल्या पाऊस धारा ।

क्षणभर पावसात भिजली धरा
गधं मातीचा दरवळला जरा ।

जेव्हा आकाशात चमचमतो तारा
येता आभाळ लुप्त होतो तो सितारा ।

दडून ढगांच्या आड देतो तो पहारा
पडतो मग पाऊस समजून इशारा  ।


हसते कळी आणी फुलवते पिसारा
मन मोहून घेई  मग सारा नजारा ।
Sanjay R.


Thursday, April 29, 2021

" पाऊस "

रिमझिम रिमझिम
हवा मज पाऊस ।
थांब ना रे ढगा
असा नको धाऊस ।
लहानपणापासुन तुझी
किती रे मला हाऊस ।
बघ डोळ्यात माझ्या
नजर नको लाऊस ।
घे मज मिठीत तुझ्या
असा नको पाहुस ।
भिजवना चिंब मला
दूर नको जाऊस ।
Sanjay R.


" चला फिरायला चांदण्यात "

चला फिरायला चांदण्यात
चमचम बघा किती गगनात ।
ओढ आम्हा चांदण्यांची किती
ठेऊन घेऊ दोनचार खिशात ।
तिकडे सप्तर्षी इकडे शुक्र तारा
बघा तारेच तारे आहेत किती
चंद्रही आहे साऱ्यांच्या मधात ।
रम्य मनोहारी किती हे दृश्य
फुले आनंद साऱ्यांच्या मनात ।
Sanjay R.