सुखद ही हवा
धुंद हा गारवा ।
उत्साह वाटे जेव्हा
फुलते मन तेव्हा ।
पहाटेचा सूर्य नवा
निघाला पक्षांचा थवा ।
कोकीळ गाई गाणे
मधुर तिचा पावा ।
Sanjay R.
रिमझिम रिमझिम
हवा मज पाऊस ।
थांब ना रे ढगा
असा नको धाऊस ।
लहानपणापासुन तुझी
किती रे मला हाऊस ।
बघ डोळ्यात माझ्या
नजर नको लाऊस ।
घे मज मिठीत तुझ्या
असा नको पाहुस ।
भिजवना चिंब मला
दूर नको जाऊस ।
Sanjay R.
आशेची पणती मिणमीणते
ओठ गीत जीवनाचे गुणगुणते ।
नाद कानात घुमघुमते
नेत्रही जागीच दिपदीपते ।
मन आतून फुलफुलते
आनंद मनातला खुलखुलते ।
भावना अंतरात सळसळते
गाल सोबतीला खळखते ।
झंकारले सूर सारे
मैफिल आयुष्याची रुणझुणते ।
Sanjay R.