Thursday, April 29, 2021

" पाऊस "

रिमझिम रिमझिम
हवा मज पाऊस ।
थांब ना रे ढगा
असा नको धाऊस ।
लहानपणापासुन तुझी
किती रे मला हाऊस ।
बघ डोळ्यात माझ्या
नजर नको लाऊस ।
घे मज मिठीत तुझ्या
असा नको पाहुस ।
भिजवना चिंब मला
दूर नको जाऊस ।
Sanjay R.


" चला फिरायला चांदण्यात "

चला फिरायला चांदण्यात
चमचम बघा किती गगनात ।
ओढ आम्हा चांदण्यांची किती
ठेऊन घेऊ दोनचार खिशात ।
तिकडे सप्तर्षी इकडे शुक्र तारा
बघा तारेच तारे आहेत किती
चंद्रही आहे साऱ्यांच्या मधात ।
रम्य मनोहारी किती हे दृश्य
फुले आनंद साऱ्यांच्या मनात ।
Sanjay R.

Tuesday, April 27, 2021

" आशेची पणती मिणमिणते "

आशेची पणती मिणमीणते
ओठ गीत जीवनाचे गुणगुणते ।

नाद कानात घुमघुमते
नेत्रही जागीच दिपदीपते ।

मन आतून फुलफुलते
आनंद मनातला  खुलखुलते ।

भावना अंतरात सळसळते
गाल सोबतीला खळखते ।

झंकारले सूर  सारे
मैफिल आयुष्याची रुणझुणते ।
Sanjay R.


" खंत आहे मनात "

खंत आहे एक मनात
वेळी अवेळी ती सलते ।
तू तिथे मी का दूर इथे
घेते धाव हे मन क्षणात ।
नाही थांबत ही आसवे
काय खुपले या डोळ्यात ।
शब्दही आता अपुरे
आहे हुंदकाही गळ्यात ।
करू कसे हे मन मोकळे
बघते तुला आकाशात ।
दूर तो दिसतो तारा
तूच असावा चांदण्यात ।
Sanjay R.

Monday, April 26, 2021

" सांगायचं नव्हतं तुला "

काहीच सांगायचं नव्हतं रे तुला
तुझ्या शिवाय सांग हवं काय मला ।

तू असतोस ना जवळ जेव्हा
सर्वच मिळाल्याचे समाधान तेव्हा ।

तुझ्याशिवाय मज नाही कुठली हाव
मन माझे तुझ्याकडेच घेते रे धाव ।

सोबत असू दे रे तूझी माझी अशीच
सुख दुःखात हवी फक्त सोबत तशीच ।
Sanjay R.