Tuesday, April 27, 2021

" आशेची पणती मिणमिणते "

आशेची पणती मिणमीणते
ओठ गीत जीवनाचे गुणगुणते ।

नाद कानात घुमघुमते
नेत्रही जागीच दिपदीपते ।

मन आतून फुलफुलते
आनंद मनातला  खुलखुलते ।

भावना अंतरात सळसळते
गाल सोबतीला खळखते ।

झंकारले सूर  सारे
मैफिल आयुष्याची रुणझुणते ।
Sanjay R.


" खंत आहे मनात "

खंत आहे एक मनात
वेळी अवेळी ती सलते ।
तू तिथे मी का दूर इथे
घेते धाव हे मन क्षणात ।
नाही थांबत ही आसवे
काय खुपले या डोळ्यात ।
शब्दही आता अपुरे
आहे हुंदकाही गळ्यात ।
करू कसे हे मन मोकळे
बघते तुला आकाशात ।
दूर तो दिसतो तारा
तूच असावा चांदण्यात ।
Sanjay R.

Monday, April 26, 2021

" सांगायचं नव्हतं तुला "

काहीच सांगायचं नव्हतं रे तुला
तुझ्या शिवाय सांग हवं काय मला ।

तू असतोस ना जवळ जेव्हा
सर्वच मिळाल्याचे समाधान तेव्हा ।

तुझ्याशिवाय मज नाही कुठली हाव
मन माझे तुझ्याकडेच घेते रे धाव ।

सोबत असू दे रे तूझी माझी अशीच
सुख दुःखात हवी फक्त सोबत तशीच ।
Sanjay R.

Sunday, April 25, 2021

" वाटलंच नव्हतं असं "

वाटलंच नव्हतं असं
पण झालं हे कसं ।
कोरोनाने जग सारं
झालं हो वेडं पिसं ।

आपलीच वाटे भितो
अंगात या भूत जसं ।
दूर दूर राहतो आता
विसरलो सारच हसं ।

मरणाच्या भीती पोटी
मलाही हवी एक लस ।
डॉक्टरचीही भीती वाटे
एकट्यातच आता बस ।

जोरजोरात घेतो कसा
ऑक्सिजन चा श्वास ।
मरणही नकोच  वाटे
सांगा येईल कोण कसं ।

स्मशानात नाही जागा
प्रेतालाही किती त्रास ।
करू तरी काय आता
मनी देवा तुझा ध्यास ।
Sanjay R.

Saturday, April 24, 2021

" माझा मी न उरलो "

कुठे ते चंद्र तारे
कुठे ते गार वारे ।
रात्रीच्या वादळात
गेलेरे उडून सारे ।

नशीबातच कष्ट
कुणा म्हणूरे दुष्ट ।
माझा मीच झालो
किती आतारे भ्रष्ट ।

भकेले जेव्हा पोट
पितो पाण्याचे घोट ।
हक्क मागतो जेव्हा
मिळे पाठीवर सोट ।

कष्ट करी हे हात
नाही कुणाची साथ ।
लाचार जिणे सारे
दिसे अश्रू डोळ्यात ।

माझा मी न उरलो
जीवनात हरलो  ।
एकटा मी प्रवासी
नकळतच सरलो ।
Sanjay R.