Tuesday, April 13, 2021

" तुलाच आता शोधतोय "

प्रश्नच आहे मनात
असं का वाटतंय ।
मनाने तर स्वीकारले
आता का जागतय ।
जात नाही उचकी
कुणाला  आठवतंय ।
गेलास ना तू दूर
तुलाच आता शोधतोय ।
तुझ्याविना शून्य सारे
तुलाही हे कळतंय ।
बंद दाराला कुलूप लागले
जीव इथे तळमळतोय ।
होईल कधी दर्शन
व्याकुळता तुलाच महितेय ।
हातात तुझ्या आता सारे
दर्शन कधी देणारेय ।
Sanjay R.


Monday, April 12, 2021

" रंग प्रेमाचा असा "

तुझं माझं प्रेम
असच राहू दे ।
सुगन्ध प्रेमाचा
दूरवर वाहू दे ।

आठवणीत तुझ्या
मला राहू दे ।
भिरभिर डोळे तुझे
मला पाहू दे ।

गालात तुला अशीच
नेहमीच हसू दे ।
मानेला देऊन झटका
माझ्यासाठी रुसू दे ।

शब्दनी शब्द तुझा
कानात गुंजू दे ।
तुझ्या या प्रेमासाठी
मलाही झुंजू दे ।

तू माझी मी तुझा
मज तुझ्यात रमू दे ।
रंग प्रेमाचा असा
मला त्यातच असू दे ।
Sanjay R.

Sunday, April 11, 2021

" लावला म्हने सोटा "

घेनं बाबू आता
पैसा म्हने तू मोठा ।
पकडलं ना पोलिसान
आनं लावला म्हने सोटा ।

रिकामा तुहा आव
कयला ना तुले भाव ।
मेहेनतीन भेटते ना
थेच आपलं राव ।

लसलस होती तुयी
देजो आता भरून ।
काय नेशीन सोबत
जाशीन असाच मरून ।

करू नोको मरमर
पांघरुणातच पाय पसर ।
सोडू नोको माणुसकी
लालच बापू विसर ।
Sanjay R.


" थोडं तुझं थोडं माझं "

आहे फुलवायची ही
या संसाराची वेल ।
थोडं तुझं थोडं माझं
दोघेही करू प्रयत्न चल ।

एकाच चाकावर कशी
चालेल संसाराची गाडी ।
सोबतीने चालू आपण
असू दे कितीही उंच माडी ।

दिशा एक ध्येय एक
संसाराला आपली जोड ।
प्रत्येक दिवस आनंदाचा
आयुष्यच मग होईल गोड ।
Sanjay R.

Saturday, April 10, 2021

" नकळत डोळे पाणावले "

कोरोना आला 
आणि सारंच बदललं ।
कुणी बघा जरा
घर अंगण स्वच्छ झाडल ।
घरातल्या कामात
स्वतःलाही जोडलं ।
परिवारात आनंदी सारे
विपरितच हे घडलं ।
संवादातून झाली जवळीक
प्रेम प्रेमात पडलं ।
विनाकारण फिरणारे
घरातच बसले ।
लग्न समारंभ सारे
पन्नास लोकांत जुडले ।
मुखावर आला मास्क
वाचायचे कसे ते जाणवले ।
दुःखद बातम्या ऐकून
नकळत डोळे पाणावले ।
Sanjay R.