Friday, April 2, 2021

" सोबत असावी शांतता "

कुठे युद्ध कुठे महामारी
नाही कुठेच शांतता ।
चढाओढीच्या धावपळीत
थकलो किती मी आता ।
मनात भीतीच्या किती शंका
चित्र बदलते पाहता पाहता ।
मनःशांतीचा ध्यास मनात
सोबत असावी शांतता ।
सोडून सारे दूर जावे
नको वाटते सारे आता ।
Sanjay R.



Thursday, April 1, 2021

" दिसू दे मज किनारा "

चला जाऊ कुठे तरी दूर
होऊन लाटेवरती स्वार ।
लढायचे आहे अजून बाकी
नाहीच मानायची हार ।
उघडा शास्त्र बघा जरा
कशी बोथट झाली धार ।
संघर्ष आहे या जीवनात
आहेत करायचे वार ।
हारू नका हो खचू नका
सोडा सारेच विचार ।
लढा एकच हे युद्ध अंतिम
होऊ विजयावरती स्वार ।
समोरच आहे किनारा
सुटेल मागे सारा भार ।
Sanjay R.


Wednesday, March 31, 2021

" लागली चाहूल "

पहाटेचा गार  गार वारा
लुप्त होतो आकाशी तारा ।
सूर्य बघतो डोकावून जरा 
प्रकाशित होतो आसमंत सारा ।
किलबिल पक्षांची त्यांचाच तोरा
लागली चाहूल नाच रे मोरा ।
Sanjay R.

Tuesday, March 30, 2021

" पूरे तुझे बहाणे "

अचानक तुझे येणे
आणि निघून जाणे ।
त्यातही होते तुझेच
न कळणारे तराणे ।
वाटायचं कधी मग
हे तर रोजचेच गाणे ।
नकोच वाटे आता
कर पुरे तुझे बहाणे ।
स्वछंद जगायचे आता
बंदिस्त नको जगणे ।
नाही भीती कशाची
शेवटी तर आहेच मरणे ।
Sanjay R.



" एवढेच काय ते मागणे "

नाही कशाचे मागणे
सारेच मज लाभले ।
देवा तुझ्याच कृपेने
जीवन माझे हे फुलले ।

काय मागू मी तुजपाशी
दे मन जसे आभाळ खुले ।
परपकारी होऊ दे मज
जशी देवावरची फुले  ।

हवा भाव मज निरागस
कुविचारांचे नको झुले ।
लोभ  मत्सर विनाशक
प्रेमानेच तन मन डोले  ।
Sanjay R.