अचानक तुझे येणे
आणि निघून जाणे ।
त्यातही होते तुझेच
न कळणारे तराणे ।
वाटायचं कधी मग
हे तर रोजचेच गाणे ।
नकोच वाटे आता
कर पुरे तुझे बहाणे ।
स्वछंद जगायचे आता
बंदिस्त नको जगणे ।
नाही भीती कशाची
शेवटी तर आहेच मरणे ।
Sanjay R.
कहाणी ही तुझी माझी
नाही तिला कुठली जोड ।
तरी वाटे मनास माझ्या
अंतरात अनामिक ओढ ।
घालवू कश्या त्या आठवणी
छेडती मज ती त्यांची खोड ।
हुंदके आणि नेत्र लढती
लागते मग त्यांचीच होड ।
जा विसरून सारे आता
भूतकाळ सारा आता तू सोड ।
दे सोडून बंधन सोडून सारे
आयुष्याला करू या गोड ।
Sanjay R.
अंतरात विचार किती
कुठे काय आहे लपून ।
क्षण ते सारेच मी
ठेवले आहेत जपून ।
शब्दन शब्द तुझा बघ
आहे हृदयात छापून ।
फुलले काव्य सुगंधी
सर्वत्र दरवळ व्यापून ।
Sanjay R.