नाही कशाचे मागणे
सारेच मज लाभले ।
देवा तुझ्याच कृपेने
जीवन माझे हे फुलले ।
काय मागू मी तुजपाशी
दे मन जसे आभाळ खुले ।
परपकारी होऊ दे मज
जशी देवावरची फुले ।
हवा भाव मज निरागस
कुविचारांचे नको झुले ।
लोभ मत्सर विनाशक
प्रेमानेच तन मन डोले ।
Sanjay R.
कहाणी ही तुझी माझी
नाही तिला कुठली जोड ।
तरी वाटे मनास माझ्या
अंतरात अनामिक ओढ ।
घालवू कश्या त्या आठवणी
छेडती मज ती त्यांची खोड ।
हुंदके आणि नेत्र लढती
लागते मग त्यांचीच होड ।
जा विसरून सारे आता
भूतकाळ सारा आता तू सोड ।
दे सोडून बंधन सोडून सारे
आयुष्याला करू या गोड ।
Sanjay R.
अंतरात विचार किती
कुठे काय आहे लपून ।
क्षण ते सारेच मी
ठेवले आहेत जपून ।
शब्दन शब्द तुझा बघ
आहे हृदयात छापून ।
फुलले काव्य सुगंधी
सर्वत्र दरवळ व्यापून ।
Sanjay R.