Thursday, March 25, 2021

" पुन्हा ती वेळ यावी "

सरतात दिवस पुढे पुढे
आठवणी उरतात मागे ।

जाऊन जुने येती नवीन
अनायास जुळती धागे ।

आठवणींच्या त्या डोहामध्ये
क्षण गेलेले ते होती जागे ।

वाटे पुन्हा ती वेळ यावी
सुखकर मग ते जीवन लागे ।
Sanjay R.


Wednesday, March 24, 2021

" सांगायचेच राहून गेले "

होते किती या मनात
सांगायचेच राहून गेले ।
क्षणोक्षणी बदलते विचार
डोळ्यावाटे वाहून गेले ।

शब्दही होते अबोल 
जिव्हे आड अडून गेले ।
सारेच होते जे अंतरात
तिथेच ते दडून गेले ।

काय उरले काय सरले
हिशोब आता नाही उरले ।
आठवणीच सरल्या आता
मनही माझे मरून गेले ।
Sanjay R.

Tuesday, March 23, 2021

" शोधून जे सापडले नाही "

शोधून जे सापडले नाही
मिळाले ते आवडले नाही ।

मनात होते ते अजून काही
शोधू कुठे मी कळत नाही ।

अधीर मन हे वळत नाही
व्हायचे ते तर टळत नाही ।

कोण कुणाला छळत नाही
विचार मनातले जळत नाही ।
Sanjay R.


Monday, March 22, 2021

" अवघा आनंद एक होतो "

असेल जेव्हा गोष्ट हिताची
अवघा आनंद एक होतो ।
नसता हित जयात ज्याचे
दुःख उराशी घेऊन रडतो ।

कधी अचानक नकार मिळता
कसा कशाला क्रोधीत होतो ।
पायी आपुल्या कुर्हाड मारून
संकट स्वतःवर ओढून घेतो ।

जीवन हे सुख दुःखाचे घर
हास्य मुखावर आनंद देतो ।
सारून बाजूस अति विचार
जगणे आपुले सुखात करतो ।
Sanjay R.

Sunday, March 21, 2021

" शल्य आहे मनात "

आठवण होता
जीव पडतो धाकी ।
शल्य आहे मनात 
अजूनही बाकी ।
आहेस कुठे तू
कोण तुला रोकी ।
झटकून विचार सारे
परत तू ये की ।
Sanjay R.