Saturday, March 13, 2021

" करू नका विलंब "

झाले गेले विसरा आता
करू नका हो विलंब ।
लस पोहोचली प्रत्येक गावी
करा तिचाच अवलंब ।

आहे कोरोनाचा कहर जारी
आजू बाजूला बघा जरा ।
किती जवळचे गेलेत दूर
झाला कसा हा जीवनाचा फेरा ।

लस घेऊन जरा सोडा चिंता 
करू नका हो उशीर आता ।
जाईल निघून हेही दिवस
व्हाल चिंतामुक्त पाहता पाहता ।
Sanjay R.

Thursday, March 11, 2021

" कोंदण "

या हृदयात माझ्या
नाव तुझे मी
ठेवले कोंदूण ।

आठवण येता
श्वासही माझे
राहतात थांबून ।

चाहूल तुझी मज
लागते जेव्हा
नजर शोधते लांबून ।

तुझ्या विना तर
जीवन माझे
ठेऊ कुठे मी डांबून ।

ये ना सखे तू
जवळ माझ्या
बंध सारे तू लांघून ।
Sanjay R.


" अल्लड तुझे वागणे "

अल्लड तुझे वागणे
लाघवी तुझे बोलणे ।

हवे वाटे मज हसणे
आवडे तुझे लाजणे ।

वेध घेई तुझे बघणे
मनात तुझ्यात रमणे ।

आतुर कान होती
अबोल तुझे बोलणे ।

मन किती सुखावते
मनात तुझेच असणे ।
Sanjay R.


" चमत्कार निसर्गाचा "

अनेक इथे बघा किती
चमत्कार या निसर्गाचे ।
वेगळा रंग वेगळा ढंग
रंग किती जीवनाचे ।
पाने फुले बहुरंगी किती
दर्शन दुर्लभ सृष्टीचे ।
पाऊस किती थंडी किती
हाल बहाल उन्हाळ्याचे ।
दिवस रात्रीचे चक्र कसे
चंद्र चांदणी आणि सूर्याचे ।
एकेक दिवस सरतो मागे
मंत्र सांगती जगण्याचे ।
आयुष्याचे दिवस किती हे
घेतो जगून सुख दुःखाचे ।
Sanjay R.


Monday, March 8, 2021

" नारी घराची शान "

नारी घराची शान
जगात तिचाच मान !!
उत्तम तिचे ज्ञान
करा सारेच सन्मान !!
Sanjay R.