Thursday, March 11, 2021

" चमत्कार निसर्गाचा "

अनेक इथे बघा किती
चमत्कार या निसर्गाचे ।
वेगळा रंग वेगळा ढंग
रंग किती जीवनाचे ।
पाने फुले बहुरंगी किती
दर्शन दुर्लभ सृष्टीचे ।
पाऊस किती थंडी किती
हाल बहाल उन्हाळ्याचे ।
दिवस रात्रीचे चक्र कसे
चंद्र चांदणी आणि सूर्याचे ।
एकेक दिवस सरतो मागे
मंत्र सांगती जगण्याचे ।
आयुष्याचे दिवस किती हे
घेतो जगून सुख दुःखाचे ।
Sanjay R.


Monday, March 8, 2021

" नारी घराची शान "

नारी घराची शान
जगात तिचाच मान !!
उत्तम तिचे ज्ञान
करा सारेच सन्मान !!
Sanjay R.

" मार्ग बचतीचा "

मंत्र बचतीचा आहे
 किती हो कामाचा ।

कशाला हात सांगा
कुणापुढे पसरायचा ।

ऐकून मग नकार 
भाव येई द्वेषाचा ।

नसतो भरवसा काही 
मग त्या आवेशाचा ।

होऊन कर्जबाजारी  
मार्ग वरचा धरायचा ।

आपल्याच हाताने
होतो प्लान मारायचा ।

उरतो परिवार मागे
प्रश्न असतो जगायचा ।

दुःख लागते मागे मग
विचार कुठला हसायचा ।
Sanjay R.


Sunday, March 7, 2021

" मनातलं गुपित "

मन गुपित गोष्टींचे भांडार
अंतरात किती सारे विचार ।
असे नसे कशाला आधार
अमर्याद विचारांचा आकार ।
नौका या जीवनाची निघाली
होईल हा अथांग सागर पार ।
Sanjay R.

Saturday, March 6, 2021

" मदतीशिवाय काय अशक्य "

मदतीशिवाय काय शक्य
होईल पूर्ण सारे अशक्य ।

प्कठीण प्रसंगी एकच ध्येय
एकमेकाशी करू साहाय्य ।

माणुसकीचा एकाच न्याय
नका करू कुणावर अन्याय ।

मीही जगेल तुम्हीही जगा ।
एकोप्याने हो सारे वागा ।
Sanjay R.