Saturday, March 6, 2021

" प्रवास नको एकट्याचा "

कठीण हा प्रवास
एकट्याने कसा करायचा
हवी साथ आपल्यांची
क्षण आनंदाने जगायचा ।
एकीत बळ किती
मिळून भार उचलायचा ।
सारेच होईल हलके
आनंद जीवनाचा अनुभवायचा ।
Sanjay R.

Thursday, March 4, 2021

" ओळखी अनोळखी "

चला जाऊ या आता मंगळावर
असू द्या ना ती जागा अनोळखी ।

असेल अन्न निवारा हवा पाणी
जगायला हवेच काय आणखी ।
करू सारे नवी जागा नवी नाती
इथे तर आता उरलेच काय बाकी ।

माणूस माणसाच्या जीवावर उठलाय
पृथ्वीवर उरलीच नाही आता माणुसकी ।

जो तो बसला आहे इथे लुटायला
नवीन लोकांशीच करू तिथे ओळखी ।
Sanjay R.


Tuesday, March 2, 2021

" पहिला आनंदोत्सव "

कसा असेल तो त्यावेळी
आनंदाचा उत्सव पहिला ।
स्वातंत्र्य मिळाले देशाला
तिरंगा आकाशी फडकला ।
अजूनही मिरवतो तसाच
अभिमान वाटतो आम्हाला ।
स्वातंत्र्याचा रंगच वेगळा
करतो नमन झेंड्याला ।
जय जय भारत माता
स्यालुट आमचा देशाला ।
Sanjay R.


Sunday, February 28, 2021

" मनाचे समाधान "

धडपड सारी चाले
हवे मनाचे समाधान ।
जगायला काय हवे
विचारांचे आदान प्रदान ।
हवे थोडे ज्ञान विज्ञान 
हवा थोडासा मान सन्मान ।
माझे माझे म्हणती किती
त्यातच वाटे त्यांना शान ।
लुटतो माणूस माणसाला
उरले कुठे माणुसकीचे भान ।
Sanjay R.



Saturday, February 27, 2021

" नको तो राग "

नको ते राग सांभाळणे 
आहे कार्य कठीण फार ।
पायाखाली नसते जमीन
दूर जातात सारे आधार ।
मुखात असेल ताकत तर
होतो समोरचा मग गार ।
नाहीतर नक्कीच भेटेल
अंग फुटेस्तो पक्का मार ।
Sanjay R.