रात्र रजनी ही सरली
बघा उषःकाल झाली ।
किरणांनी सूर्याच्या
न्हाऊन धरा निघाली ।
चिवचिव ती पाखरांची
गाणी मंजुळ झाली ।
झुळूक गार वाऱ्याची
गुलाब हसतो गाली ।
दूर कुठे तो नाद घंटेचा
फेरी भक्तांची निघाली ।
नामे विठ्ठलाचा नाद
भक्त तयाचे माऊली ।
Sanjay R.
गावाच्या शिवेवर
आहे पडका वाडा ।
मालक त्याचा म्हणे
कोणी होता बडा ।
म्हणतात तो प्रेमात
झाला होता वेडा ।
वेड पागलपणाचे
याला त्याला छेडा ।
प्रेयसी संगे एकदा
झाला त्याचा राडा ।
काटा तिनं काढला
लागला नाही छेडा ।
म्हणे भूत झाले त्याचे
रात्री अवतरतो वेडा ।
सापडेल जोही त्याला
वाढते त्याची पीडा ।
सगळेच आता भितात
भकास पडला वाडा ।
Sanjay R.